नागपुरातील फायर कॉलेजमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:10 AM2018-08-08T11:10:28+5:302018-08-08T11:13:56+5:30

गेल्या तीन वर्षांपासून बीई फायर इंजिनिअरिंग कोर्स संचालित करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षणासाठी जुळलेल्या या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असलेले तांत्रिक मॉड्युल अजूनही तयार केलेले नाही, शिवाय तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

The lack of technical staff in the Fire College in Nagpur | नागपुरातील फायर कॉलेजमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता

नागपुरातील फायर कॉलेजमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता

googlenewsNext
ठळक मुद्देतांत्रिक मॉड्युलचे कार्य अपूर्ण अनेक उपकरणे नाहीत

वसीम कुरैशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गृहमंत्रालयाचे देशातील एकमेव आणि मोठ्या फायर कॉलेजचे बांधकाम उपराजधनीत गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीई फायर इंजिनिअरिंग कोर्स संचालित करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षणासाठी जुळलेल्या या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असलेले तांत्रिक मॉड्युल अजूनही तयार केलेले नाही, शिवाय तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
फायर फायटिंग, बचाव व आपदा स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने येथे मॉड्युल तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता हेलिपॅडची निर्मिती केली आहे, पण हेलिकॉप्टर नाही. एक इमारत तयार असून, ती रिक्त आहे. रेल्वेचे डबेही नाहीत. याशिवाय दुर्घटना आणि आपदा स्थिती दर्शविणारी व्यवस्था अजूनही पूर्ण झालेली नाही. अशास्थितीत या कॉलेजमध्ये बीई फायर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचे (चौथे वर्ष) विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांकडून फी आणि होस्टेलचे शुल्क वसूल करण्यात येत आहेत, पण तांत्रिक पैलूंच्या कमतरतेमुळे त्यांचे शिक्षण अपुरे समजले जाईल. कॉलेजमध्ये तांत्रिक सल्ल्यासाठी नेदरलँडची कंपनी ‘फाल्क’ला पाच कोटींच्या कंत्राटावर सल्लागार नियुक्त केले होते. या कंपनीने अर्धवट काम करून पलायन केले आहे. पायाभूत सुविधा पूर्ण होण्यापूर्वीच ‘फाल्क’ची मदत घेणे चुकीचे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशात कुठेही बीई फायर इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम नाही. त्यानंतरही कॉलेजमधील तांत्रिक त्रुटी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभावित करीत आहेत. सद्यस्थितीत कॉलेजमध्ये ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कॉलेजच्या कामाला वेग
प्राप्त फंडातून प्रयोगशाळेसाठी उपकरणे आणि अ‍ॅम्ब्युलन्स आणण्यात आली आहे. तांत्रिक मॉड्युलकरिता या महिन्यात निविदा निघणार आहे. कॉलेजला विभिन्न कामासाठी मिळालेला निधी पूर्णपणे खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे कामात आता वेग आला आहे.
- जी.एस. सैनी,
संचालक (प्रशासन), एनएफएससी.

Web Title: The lack of technical staff in the Fire College in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.