सतरंजीपुरा, आसीनगर झोनमध्ये लसीकरण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:50+5:302021-09-19T04:09:50+5:30

नागपूर : कोरोनाशी लढताना लसीकरण हेच महत्वाचे शस्त्र ठरले आहे. लसीकरणानंतरही पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये लक्षणे कमी आढळली. रुग्णालयात दाखल होण्याची ...

Lack of vaccination in Sataranjipura, Asinagar zone | सतरंजीपुरा, आसीनगर झोनमध्ये लसीकरण कमी

सतरंजीपुरा, आसीनगर झोनमध्ये लसीकरण कमी

Next

नागपूर : कोरोनाशी लढताना लसीकरण हेच महत्वाचे शस्त्र ठरले आहे. लसीकरणानंतरही पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये लक्षणे कमी आढळली. रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. या उलट स्लम भागात लसीकरणावरून बराच संभ्रम दिसत आहे. मनपाच्या ज्या झोनमध्ये स्लम वस्ती आहे, तिथेच लसीकरण कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सतरंजीपुरा रेड झोनमध्ये होता. याच झोनमध्ये कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली. मात्र लसीकरण करणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे.

सतरंजीपुरा झोनमध्ये आतापर्यंत ७३,८५३ लसीकरण झाले. यात पहिला डोस घेणारे ५२,९७७ तर दुसरा डोस घेणारे २०,८७६ आहेत. उत्तर नागपुरातील आसीनगर झोनमध्यही स्लम वस्तींची संख्या अधिक आहे. अर्थात येथेही लसीकरण कमी आहे. या झोनमध्ये १,३०,३६१ जणांचे लसीकरण झाले. यात पहिला डोस घेणारे ९४,६४६ तर दुसरा डोस घेणारे ३५,७१५ आहेत. धरमपेठ, धंतोली, लक्ष्मीनगर आणि मंगळवारी झोनमध्ये लसीकरणाची स्थिती चांगली आहे.

नगरसेवकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्लम भागात लसीकरणाबद्दल बरेच गैरसमज आहेत. लसीकरणामुळे अशक्तपणा येतो, शरीराचे अवयव प्रभावित होतात अशा अनेक चुकीच्या धारणा आहेत. प्रत्यक्षात लसीकरणामुळे प्रतिकारक्षमता वाढते, कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यास मदत होते, असे वैद्यकीय चिकित्सकांनी स्पष्ट केेले आहे.

...

झोननिहाय लसीकरण

झोन : पहिला डोस : दुसरा डोस : एकूण

लक्ष्मीनगर : १,५३,९६६ : ८२,६२२ : २,३६,५८८

धरमपेठ : १,९५,४५४ : ९५,७१२ : २९११६६

हनुमान नगर : ११७७०३ : : ५२,३५३ : १,७०,०५६

धंतोली : १,४७,८२३ : ९०,६६३ : २,३८,४८६

नेहरू नगर : १,१६,९३३ : ४६,४७१ : १,६३,४०४

गांधीबाग : १,१०,४६५ : ६९१४६ : १,७९,६११

सतरंजीपुरा : ५२,९७७ : २२,८७६ : ७३८५३

लकडगंज : १,२५,१३३ : ३२,८४५ : १,५७,९७८

आशीनगर : ९४,६४६ : ३५,७१५ : १,३०,३६१

मंगळवारी :१,५२,४५१ : ६९,९९७ : २२२४४८

एकूण : १२,६७,५५१ : ५९,६४,००० : १८,६३,९५१

(आकडेवारी १६ सप्टेबरपर्यंतची)

Web Title: Lack of vaccination in Sataranjipura, Asinagar zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.