कूलर उद्याेगाला लाॅकडाऊनचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:01+5:302021-03-13T04:16:01+5:30

राम कूलरचे राकेश अवचट यांनी १५ ते २१ मार्च या काळात घाेषित करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. ...

Lackdown hits cooler industry | कूलर उद्याेगाला लाॅकडाऊनचा जबर फटका

कूलर उद्याेगाला लाॅकडाऊनचा जबर फटका

Next

राम कूलरचे राकेश अवचट यांनी १५ ते २१ मार्च या काळात घाेषित करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील तापमान उन्हाळ्याच्या काळात टाेकाला पाेहोचते. त्यामुळे हाेणाऱ्या उष्णतेबाबत सर्व परिचित आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात कूलर ही गरज झाली असल्याने या व्यवसायाचा माेठा व्याप विदर्भात असताे. या क्षेत्रात कूलर निर्माता व काम करणाऱ्या कामगारांसह प्रत्यक्षपणे १० हजार लाेकांचा राेजगार जुळला आहे. गेल्या वर्षी याच काळात काेराेना महामारीने थैमान घातले आणि लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता. अनलाॅकनंतर इतर व्यवसायांना सावरण्याची संधी मिळाली; पण, कूलर व्यवसायाचा सीजन निघून गेला हाेता. त्यामुळे हे क्षेत्र पुरते काेलमडले. हा फटका भरून काढण्यासाठी वर्षभराची वाट बघावी लागते. या वर्षी उन्हाळा नुकताच सुरू झाला असताना पुन्हा काेराेनाने डाेके वर काढले. त्यामुळे १५ मार्चपासून संपूर्ण आठवडा लाॅकडाऊन करण्याची घाेषणा प्रशासनाने केल्याने कूलरचा व्यवसाय संपूर्णपणे डबघाइस येण्याची भीती अवचट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येक कूलर कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यताही राकेश अवचट यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Lackdown hits cooler industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.