लाेकप्रतिनिधींनी घेतला विकास कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:17+5:302021-09-02T04:17:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : स्थानिक नगर पंचायतच्या सभागृहात साेमवारी (दि. ३०) आढावा बैठक पार पडली. यात लाेकप्रतिनिधींनी शहरातील ...

Lake representatives reviewed the development work | लाेकप्रतिनिधींनी घेतला विकास कामाचा आढावा

लाेकप्रतिनिधींनी घेतला विकास कामाचा आढावा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : स्थानिक नगर पंचायतच्या सभागृहात साेमवारी (दि. ३०) आढावा बैठक पार पडली. यात लाेकप्रतिनिधींनी शहरातील विविध विकास कामाचा आढावा घेत रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. शिवाय, नागरिकांच्या समस्या साेडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

अध्यक्षस्थानी आ. आशिष जयस्वाल हाेते. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, तहसीलदार प्रशांत सांगडे, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नगर पंचायतचे गटनेता दीपक शिवरकर, सागर सायरे, नगरसेवक विजय भुते, राहुल ढगे, राहुल नाखले, देवानंद वाकोडे, अविनाश भिमटे, नगरसेविका अनिता भड, आशा वैद्य, गुलनाझ शेख, रोशन पिंपळामुळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.

या आढावा बैठकीत शहरातील रस्ते व नाल्यांचे मोजमाप करून त्यांचे इस्टिमेट तयार करणे, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करणे, जुना बसस्थानक ते तकिया मारोती मंदिर रस्त्याच्या कामात भूमिअभिलेख कार्यालयाकडून हाेत असलेली दिरंगाई व त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला हाेणारा विलंब, त्यावर ताेडगा काढणे, खारी येथील एका रस्त्यावर काही घरे येत असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता तयार हाेऊ शकला नाही, काही भूखंडधारकांना जागा उपलब्ध होऊ न शकणे यासह अन्य कामे व समस्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यावेळी आ. आशिष जयस्वाल यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना रस्ता माेजून प्लॉट उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शहरातील गवंडी काम करणारे, वाजंत्री वाजविणारे, ऑटोचालक, हमाल यांची यादी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

310821\20210831_155348.jpg

सभा

Web Title: Lake representatives reviewed the development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.