काँक्रिट कंपनीतून लाेखंडी प्लेट लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:07+5:302021-09-26T04:10:07+5:30
खापरखेडा : अज्ञात आराेपीने विटा तयार करण्याच्या ३० ते ३२ नग लाेखंडी प्लेट चाेरून नेल्या. त्या प्लेटची किंमत २५ ...
खापरखेडा : अज्ञात आराेपीने विटा तयार करण्याच्या ३० ते ३२ नग लाेखंडी प्लेट चाेरून नेल्या. त्या प्लेटची किंमत २५ हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वारेगाव येथील एआयएम काँक्रिट कंपनीत शुक्रवारी (दि.२४) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
राजेश माराेती नेवारे (३५, रा. गाेंदिया एआयएम काँक्रिट कंपनी वारेगाव) यांनी कंपनीमध्ये मशीनजवळच्या खुल्या जागेत ३० ते ३२ नग विटा तयार करण्याच्या लाेखंडी प्लेटा ठेवल्या हाेत्या. दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्या प्लेटा आराेपीने चाेरून नेल्या. ही बाब लक्षात येताच नेवारे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस नाईक दीपक रेवतकर करीत आहेत.