व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:12 AM2020-07-31T00:12:55+5:302020-07-31T00:14:57+5:30

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे.

Lakhs of land was grabbed by paying interest debt | व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली

व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध सावकारीचे आणखी एक प्रकरण : तपन टोळीचा पीसीआर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने आरोपी तपन जयस्वाल, विकी गजभिये, बंटी बोरकर आणि समीर ऊर्फ बाळा राऊत या चौघांची न्यायालयातून २ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी वाढवून घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हिल रोड निवासी यशवंत इंगळे यांनी एप्रिल २०१९ मध्ये तपनकडून १२ लाख रुपये कर्ज घेतले होते. बदल्यात त्याचा वर्धा मार्गावरील एका भूखंडाची पॉवर ऑफ अटर्नी करून दिली होती. त्याचा गैरवापर करून तपनने हा लाखोंची किंमत असलेला भूखंड स्वत:च्या नावावर करून घेतला. ही बाब उघड झाल्यानंतर इंगळे यांनी आता गुन्हे शाखेकडे धाव घेतली आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या तपन आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले आणि त्यांची २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.

Web Title: Lakhs of land was grabbed by paying interest debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.