बसस्थानकात लालपरी चालकांची बेशिस्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:10 AM2021-08-28T04:10:59+5:302021-08-28T04:10:59+5:30
नागपूर : गणेशपेठ बसस्थानकावरून दररोज ५०० बस बाहेरगावी जातात. बसच्या तुलनेत प्लॅटफॉर्मची संख्या कमी आहे. त्यामुळे चालक प्लॅटफॉर्म सोडून ...
नागपूर : गणेशपेठ बसस्थानकावरून दररोज ५०० बस बाहेरगावी जातात. बसच्या तुलनेत प्लॅटफॉर्मची संख्या कमी आहे. त्यामुळे चालक प्लॅटफॉर्म सोडून दुसरीकडेच बस उभी करतात. बसची वाट पाहत प्रवासी प्लॅटफॉर्मवर बसलेले असतात. त्यामुळे दुसरीकडे बस लागली याची बहुतांश प्रवाशांना माहितीच नसते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच बस लावण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
या बेशिस्तीला जबाबदार कोण ?
-प्लॅटफॉर्म सोडून दुसरीकडे बस लावण्याचा बेशिस्तपणा चालक करतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बसची वाट पाहत थांबावे लागते. दुसरीकडे बस लागल्यामुळे त्यांना बसची माहितीच नसते. त्यामुळे त्यांची बस सुटते. पुन्हा दुसरी बस लागण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरच बस लावण्याची गरज आहे. या बेशिस्तीला जबाबदार असलेल्या चालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
वाहतूक नियंत्रकांची नेमणूक
‘बसची माहिती देण्यासाठी बसस्थानकावर वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्लॅटफॉर्मवर बसलेल्या प्रवाशांना हे वाहतूक नियंत्रक बस दुसरीकडे लागली असल्यास त्याची माहिती देतात.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
बसची माहिती कळत नाही
‘प्लॅटफॉर्मवर बस लागत असल्यामुळे मी प्लॅटफॉर्मवरील बाकड्यावर बसतो. परंतु अनेकदा बस दुसरीकडेच लागते. त्यामुळे बसची माहिती कळत नसून बस सुटण्याची भीती राहते.’
-राहुल सोनटक्के, प्रवासी
प्लॅटफॉर्मवरच बस लावावी
‘प्रवासी बसची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर बसून असतात. परंतु प्लॅटफॉर्मवर बस न लावता चालक दुसरीकडे बस लावतात. अशा स्थितीत बस निघून गेली तरी प्रवाशांना माहीत होत नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच बस लावण्याची गरज आहे.’
-बाबाराव जाधव, प्रवासी
............