विदर्भातील फेमस 'मटका रोटी' जिची आहे दूरवर ख्याती.. एकदा खाऊन तर बघा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 06:04 PM2022-02-18T18:04:34+5:302022-02-18T18:26:57+5:30
विदर्भात या युनिक मटका रोटिला लंबी रोटी किंवा मांडे देखील म्हणतात. विदर्भात या रोटीचा प्रकार पिढ्यानपिढ्या बनत आलाय.
सुरभी शिरपूरकर
नागपूर : गरमागरम माठावर तयार होतीय मटका रोटी... रुमाला पेक्षाही अतिशय पातळ अशीही मटका रोटी विदर्भातील एक फेमस खाद्यप्रकार आहे. रोटी बनवण्याची पद्धत पाहूनच ही रोटी खायची इच्छा कोणालाही होईल. पण जर का ही रोटी तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला विदर्भातच यावं लागणार आहे. कारण ही रोटी जगात केवळ एकाच ठिकाणी भेटते. ते म्हणजे विदर्भ.. त्यातही संत्रा नगरीत या मटका रोटीला विशेष मागणी आहे. बोले तो नागपुरात मटका रोटीचा..अलगीच माहोल है बावा..
विदर्भात या युनिक मटका रोटिला लंबी रोटी किंवा मांडे देखील म्हणतात. विदर्भात या रोटीचा प्रकार पिढ्यानपिढ्या बनत आलाय. रुमाली रोटी सारखी दिसणारी ही रोटी पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनते. आणि या रोटीला बनविण्यासाठी याचा वेगळा स्पेशल माठ तयार करण्यात येतो.
नॉनव्हेज सोबत या रोटीची चवच न्यारी आहे. विशेष करून मटण किवा चिकन सोबत ही रोटी खाण्यात वेगळीच मज्जा आहे. मात्र नॉनव्हेजशिवाय पाटवडी रस्सा किंवा कढाई पनीर, आमरस, श्रीखंड या सोबतही लम्बी रोटी खायला लोकांची पसंती आहे.
मटका रोटी बनविण्याची प्रक्रिया अतिशय आगळी वेगळी आहे.. ही बघून मटका रोटी खाण्याचा मोह आवरता येत नाही.. ही रोटी दिसायला जितकी युनिक तितकीच चवीलाही एकदम भारी आहे. काय तर मग येतायेत ना नागपूरला ?? मटका रोटी चाखायला..??