३४ हजाराचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:08 AM2021-03-15T04:08:48+5:302021-03-15T04:08:48+5:30
काटाेल : अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही ...
काटाेल : अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना काटाेल शहरातील श्रीरामनगर पंचवटी येथे शनिवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
प्रमाेद नामदेव अलाेणे (४८, रा. खैरगाव, हल्ली मु. श्रीरामनगर, पंचवटी, काटाेल) हे शनिवारी (दि.१३) आपल्या कुटुंबीयांसह गावी गेले हाेते. दरम्यान, त्यांच्या घरी कुणीही नसताना चोरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चोरट्याने घरातील बेडरूममधील लाेखंडी आलमारीमध्ये ठेवलेले २० हजार रुपयांची सोनसाखळी, सहा हजाराची तीन ग्रॅम साेन्याची अंगठी, सहा हजार रुपयांचे साेन्याचे १० मणी व डाेरले दागिने, १,५०० रुपयांचे दाेन जाेड चांदीच्या ताेरड्या व १,२०० रुपयांचे पायातील चांदीचे तीन जाेड पैजण असा एकूण ३४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, शेजारी राहणारे राधेश्याम मुराेडिया यांनी अलाेणे यांना फाेनद्वारे ‘तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे’ अशी माहिती दिली. लागलीच त्यांनी काटाेल येथे येऊन पाहणी केली असता, घरात चाेरी झाल्याचे निदर्शनात आले. याबाबत अलाेणे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. याप्रकरणी काटाेल पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार जवाहर चव्हाण करीत आहेत.