३६ हजार रुपयाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:15+5:302021-07-17T04:08:15+5:30
पाटणसावंगी : टाकळी (भन्साळी) येथे घरफाेडी झाल्याची घटना नुकतीच घडली असून, शुक्रवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली. यात चाेरट्याने ...
पाटणसावंगी : टाकळी (भन्साळी) येथे घरफाेडी झाल्याची घटना नुकतीच घडली असून, शुक्रवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली. यात चाेरट्याने साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
धनराज सीताराम हुमणे (४३, रा. टाकळी भन्साळी, ता. सावनेर) हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने खाेलीतील कपाट हुडकून त्यातील ३४ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने व दाेन हजार रुपये राेख असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेल्याचे धनराज हुमणे यांनी पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर करीत आहेत.