७२ हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:26+5:302021-02-23T04:11:26+5:30

सावनेर : चाेरट्याने प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधील साेन्या-चांदीचे दागिने चाेरून नेले. त्या दागिन्यांची एकूण किंमत ७२ हजार ५०० रुपये आहे. ...

Lampas stole Rs 72,000 | ७२ हजाराचा ऐवज लंपास

७२ हजाराचा ऐवज लंपास

Next

सावनेर : चाेरट्याने प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधील साेन्या-चांदीचे दागिने चाेरून नेले. त्या दागिन्यांची एकूण किंमत ७२ हजार ५०० रुपये आहे. ही घटना खापरखेडा ते सावनेर दरम्यानच्या प्रवासात शनिवारी (दि. २०) दुपारी घडली.

छाया श्रीकृष्ण गाैरखेडे (५२, रा. परसाेडी, ता. कळमेश्वर) या त्यांचे नातेवाईक अरुण गजभिये, रा. खापरखेडा, ता. सावनेर यांच्याकडे पाहुण्या म्हणून गेल्या हाेत्या. तिथे त्यांनी मुलीच्या लग्नाच्या साहित्याची खरेदी केली. काम आटाेपल्यानंतर त्या शनिवारी दुपारी खासगी प्रवासी वाहनाने खापरखेड्याहून सावनेरला आल्या. सावनेर शहरातील गडकरी चाैकातून पायी जात असताना त्यांना त्यांच्या बॅगची चेन उघडी असल्याचे आढळून आले. बॅगमधील साेन्या-चांदीचे दागिनेही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसात तक्रार दाखल केली. चाेरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ७२ हजार ५०० रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार नारायण बाेरकर करीत आहेत.

Web Title: Lampas stole Rs 72,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.