१.१५ लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:16+5:302021-09-04T04:12:16+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल/खापरखेडा : चाेरट्यांनी काटाेल शहर व नांदा (ता.कामठी) शिवारात चाेरी करीत साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम व ...

Lampas worth Rs 1.15 lakh | १.१५ लाखांचा मुद्देमाल लंपास

१.१५ लाखांचा मुद्देमाल लंपास

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल/खापरखेडा : चाेरट्यांनी काटाेल शहर व नांदा (ता.कामठी) शिवारात चाेरी करीत साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम व विदेशी दारूच्या बाटल्या, असा एकूण १ लाख १५ हजार ७५५ रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. या दाेन्ही घटना नुकत्याच घडल्या.

छाया रवि राठाेड, रा.सरस्वतीनगर, काटाेल या त्यांच्या कुटुंबीयांसह गुजरातमध्ये गेल्या हाेत्या. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला व पर्समध्ये ठेवलेले ४७ हजार २५० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपये राेख असा एकूण ९७ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब विनाेद माेहनसिंग परमाल (५३, रा.काटाेल) यांच्या लक्षात येताच, त्यांनी छाया राठाेड यांना कळविले. त्यांच्या सूचनेवरून विनाेद परमाल यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली.

चाेरीची दुसरी घटना खापरखेडा (ता.सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा शिवारात घडली. विलास उमाशंकर उकाेने (३६, रा.पहलेपार, खापा, ता.सावनेर) यांचे नांदा शिवारात बर ॲण्ड रेस्टाॅरंट आहे. बार बंद असताना, तसेच तिथे कुणीही नसताना चाेरट्याने शटरचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने १६,७५५ रुपये किमतीची विदेशी दारू व १,५०० रुपये राेख असा एकूण १८,२५५ रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच, विलास उकाेने यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी अनुक्रमे काटाेल व खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भादंवि ३७९, ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनांचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक लभाणे व पाेलीस हवालदार नावेद खान करीत आहेत.

Web Title: Lampas worth Rs 1.15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.