नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:05 AM2019-01-14T11:05:00+5:302019-01-14T11:06:55+5:30

मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

Land health of Nagpur district has worsened | नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

googlenewsNext
ठळक मुद्देमाती परीक्षणात आढळली अन्नद्रव्याची कमतरता पारंपरिक खतांची उपयोगिता वाढविणे गरजेचे

मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील शेतीच्या केलेल्या माती परीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्याचा परिणाम पिकांबरोबरच मानवाच्या आरोग्यावरही होत आहे.
जमिनीची उत्पादकता ही १६ अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य अन्नघटक म्हणजे नत्र, स्फुरद व पलाश आहे. तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश आहे.
सूक्ष्म अन्नघटकांमध्ये लोह, मिनरल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरिन यांचा समावेश आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील केलेल्या माती परीक्षणातून महत्त्वाचे घटक असलेल्या नत्राची कमतरता प्रत्येक तालुक्यात आढळली आहे. तर स्फुरद या अन्नघटकाची नागपूर, रामटेक व कुही तालुक्यात कमतरता आढळली आहे. जमिनीतील या दोन्ही घटकाच्या कमतरतेमुळे झाडे ठेंगू राहून पाने पिवळी होणे, पाने वाळून गळणे, झाडांची वाढ खुंटणे, पानांचा रंग बदलणे आदी लक्षण झाडांवर दिसून येत आहे. त्याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म घटकांमध्येही कमतरता आढळली आहे. झिंक अन्नघटकाची नागपूर सोडल्यास इतर सर्व तालुक्यात कमतरता आढळली आहे. लोहतत्त्वसुद्धा सर्वच तालुक्यात घटलेले आहे. लोहामुळे पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो. झिंकमुळे झाडे लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मोठ्या भाजीपाल्याचे उत्पादन होते. जमिनीत जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मानवी आरोग्यास आवश्यक असलेले पोषक घटक उपलब्ध होत नाही.

शरीरावर परिणाम होतो
सेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्यामुळे नत्राची कमतरता झाली आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम तर होतच आहे; सोबतच मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वाची कमतरता आढळल्याने शरीरावरही त्याचा परिणाम होत आहे.

नत्र वाढविण्यासाठी उपाययोजना
जमिनीतील सेंद्रिय कर्व्ह वाढविणे आवश्यक आहे. याकरिता शेतकºयांनी जास्तीत जास्त शेणखत, गांडुळखत, नॅपेड खत, सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खतसुद्धा वापरल्यास जमिनीतील नत्राची मात्रा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर द्विदल पिके घेऊन पिकाचे रोटेशन करण्यात यावे.
अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी

Web Title: Land health of Nagpur district has worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती