कोट्यवधीची ‘जनपद’ची जमीन हडपली
By admin | Published: March 19, 2016 02:33 AM2016-03-19T02:33:04+5:302016-03-19T02:33:04+5:30
स्वातंत्र्यापूर्वीच्या तारखेच्या नोंदीसह एकाने ‘ डिजिटल’ अधिकार अभिलेख तयार करून कोट्यवधीची ‘जनपद’ ची जमीन स्वत:च्या
राहुल अवसरे ल्ल नागपूर
स्वातंत्र्यापूर्वीच्या तारखेच्या नोंदीसह एकाने ‘ डिजिटल’ अधिकार अभिलेख तयार करून कोट्यवधीची ‘जनपद’ ची जमीन स्वत:च्या नावे केली. स्वातंत्र्यापूर्वी आधुनिक संगणक प्रणाली अस्तित्वात होती काय, असा प्रश्न उपस्थित करून या दस्तऐवजाने शासकीय यंत्रणेत खळबळ उडवून दिली आहे.
मौजा अजनी (खुर्द ) येथील या जमिनीचा खसरा क्रमांक ४७/३, असा नमूद करण्यात आला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ ०.१० एच.आर. असे नमूद आहे. जमीन ताब्यातील कुळधारकाचा उल्लेख गोपाळराव गंगाधर गाडगे , असा करण्यात आला आहे. ‘तीन रुपये आठ आणे’ एवढ्या किमतीच्या स्टॅम्प पेपरवर ३६१ (रोमन लिपीत ११) -९/४३-४४ असा क्रमांक नमूद करून डेप्युटी कमिश्नर, नागपूर यांच्या सही व शिक्क्यानिशी अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेला आहे.
अर्धा चौरस कि. मी. क्षेत्रफळ असलेली ही जमीन आताच्या साई मंदिराच्या मागच्या भागातील आहे. मूळ जमीन ‘जनपद’ ची अर्थात आताच्या नागपूर जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. सध्या या जमिनीची किंमत २२ ते २५ कोटी रुपये आहे, ही माहिती जिल्हा परिषदेचे वकील अॅड. मनोज साबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. कधी गोपाळराव गंगाधर गाडगे तर कधी गंगाधर गोपाळराव गाडगे, अशा काल्पनिक नावांचा वापर करून त्यांना कागदोपत्री ताबेदार कुळधारक दाखविल्यानंतर नरेश ठाकरे नावाच्या एका व्यक्तीने ही जमीन स्वत:च्या नावे केली आहे.