मिहानला संरक्षण खात्याची जमीन
By admin | Published: May 18, 2015 02:37 AM2015-05-18T02:37:46+5:302015-05-18T02:37:46+5:30
मिहान प्रकल्पाला गती मिळावी यासाठी प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा ...
नागपूर : मिहान प्रकल्पाला गती मिळावी यासाठी प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नागपूरचे खासदार व केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नला अखेर यश आले आहे. रविवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत येथील रविभवनात झालेल्या बैठकीत मिहानसाठी लागणाऱ्या संरक्षण खात्याच्या जमिनीचा मुद्दा निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे संरक्षण खात्याची २७८ हे.जमीन मिहानला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे खुद्द पर्रीकर यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
मिहान प्रकल्पासाठी संरक्षण खात्याची २७८ हे. जमीन हवी होती. त्याच्या हस्तांतरणाचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून सुटला नव्हता. केंद्रात सत्तापालट झाल्यावर व नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाल्यावर त्यांनी यासाठी पाठपुरावा सुरूकेला होता.
काही प्रश्न निकाली
काही पाईपलाईनमध्ये
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील सीताबर्डी किल्ला, गणेश टेकडी मंदिराच्या वाहनतळासाठी लागणारी संरक्षण खात्याची जागा, कामठी आणि वाडीतील जागेचे प्रश्न आणि चंद्रपूर आयुध निर्माणी क्षेत्रातील जमीन याबाबत आढावा घेतला. यापैकी काही प्रश्न निकाली निघाले, काही पाईपालाईनमध्ये आहेत तर काहींवर दिल्लीतून तोडगा काढल्या जाईल,असे पर्रीकर म्हणाले.