भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांना हवी तांत्रिक वेतनश्रेणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:41+5:302021-09-25T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूमिअभिलेख कर्मचारी जी कामे करतात ती तांत्रिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे त्यांना तांत्रिक वेतनश्रेणी मिळावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमिअभिलेख कर्मचारी जी कामे करतात ती तांत्रिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे त्यांना तांत्रिक वेतनश्रेणी मिळावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात समितीसुद्धा गठित करण्यात आली असून, या समितीचा अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा आणि भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी तातडीने मिळावी, अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
अप्पर जमाबंदी आयुक्त भूमिअभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते हे नुकतेच नागपुरात आले असता, विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना मागणीचे निवेदनही सादर केले. या निवेदनात तांत्रिक वेतनश्रेणीच्या मागणीसोबतच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पार पाडण्यात यावी, पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात यावा, आदी मागण्यांचाही समावेश होता.
विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे, सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात विशाल खलोरे, शरद उमप, प्रदीप मिश्रा, गौरव रोकडे, फिरोज खान, बाबू आडे, सतीश साकुरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी होते.