जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:34 AM2017-09-01T01:34:01+5:302017-09-01T01:34:56+5:30

भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.

Land is tired, the end of pinch | जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

Next
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जण विहिरीत पडले: चार बचावले : मानकापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकले. बचाव कार्य करणाºयांनी विहिरीतून चौघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
गायत्रीनगर झिंगाबाई टाकळी परिसरातील सचिन ले-आऊटमध्ये राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून यादवराव चौधरी (वय ७०) यांचा परिवार भाड्याने राहतो. यादवराव चौधरी राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, ते त्यांचा मुलगा सुधीर (वय ३७), सून सुरेखा (वय ३५) आणि वेदांत (वय ५) तसेच अंकुश (वय २ वर्षे) तेथे राहतात.
विहीर खचली, चिमुकल्याचा अंत
सुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.
चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.
तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले. चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दुर्घटनेचे संकेत मिळाले होते
चौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.
सुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.
चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.
तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दुर्घटनेचे संकेत मिळाले होते
चौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.

Web Title: Land is tired, the end of pinch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.