उर्ध्व वर्धा कालव्यालगतची जमीन शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:18 PM2018-06-15T23:18:25+5:302018-06-15T23:18:44+5:30
उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे जलग्रहण क्षेत्र ४३०२ चौरस किमी आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा ९५.५० किमी व डावा कालवा ४२.४० किमी आहे. या कालव्याकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन शिल्लक आहे. ही जमीन पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात शेतीसाठी देण्यात येत आहे. यामध्ये प्रकल्पबाधित व्यक्ती, भूमिहीन, मागासवर्गीय सहकारी संस्था, मागासवर्गीयेतर भूमिहीन व्यक्तींची सहकारी संस्था, भूमिहीन व्यक्तींच्या सहकारी संस्था, मागासवर्गीय भूमिहीन अर्ज सादर करून शकतात.
पात्र लाभार्थी कुटुंबाला १.२० हेक्टर जमीन भाडेपट्टीवर देण्यात येईल. कुटुंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६ नुसार १.६ हेक्टर इतकी जमीन देण्यात येईल. एका वर्षात दोन पिके घेतल्यास अर्जदारास ११ महिने कालावधीसाठी प्रति हेक्टरी २ हजार रुपये तसेच एका पिकासाठी प्रति हेक्टरी १ हजार रुपये व आवश्यक दस्तावेजासमवेत उपविभागीय अधिकारी, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र.१, मोर्शी येथे ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.