दुसऱ्या जागतिक महायुद्धातील विमानाचे सोनेगावमध्ये लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:34 PM2019-11-04T23:34:36+5:302019-11-04T23:37:54+5:30
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘सिल्व्हर स्टिपरफायर’ विमानाचे सोमवारी सोनेगाव स्टेशनमध्ये लँडिंग करण्यात आले. वायुसेना स्टेशन सोनेगावचे स्टेशन कमांडर एस. के. तिवारी यांनी पायलट स्टीव्ह बुक आणि जेम्स पॅट यांचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘सिल्व्हर स्टिपरफायर’ विमानाचे सोमवारी सोनेगाव स्टेशनमध्ये लँडिंग करण्यात आले. वायुसेना स्टेशन सोनेगावचे स्टेशन कमांडर एस. के. तिवारी यांनी पायलट स्टीव्ह बुक आणि जेम्स पॅट यांचे स्वागत केले.
‘सिल्व्हर स्पिटरफायर’ हे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळातील विमान आहे. आपल्या वर्ल्ड टुर अभियानांतर्गत हे विमान २७ हजार मैलांचा प्रवास करीत आहे. २९ देशात भेट देऊन हे विमान १०० ठिकाणी थांबणार आहे. या विमानाने भारतीय वायू क्षेत्रात २ नोव्हेंबर २०१९ ला प्रवेश करून कोलकातामध्ये लँडिंग केले. आपल्या अभियानांतर्गत हे विमान ४ नोव्हेंबरला सोनेगाव वायुसेना स्टेशनमध्ये उतरले. या विमानाचे पायलट स्टिव्ह बुक आणि जेम्स पॅट यांनी सोनेगाव वायुसेना स्टेशनच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेत सिल्व्हर स्पिटरफायर या विमानाच्या पायलटने एक इंजिन असलेल्या ‘सिल्व्हर स्पिटरफायर’ विमानाच्या ऐतिहासिक प्रवासातील अनुभव सांगितले. या अभियानाची सुरुवात ऑगस्टमध्ये इंग्लंडमधून झाली. दुसऱ्या महायुद्धात ज्या देशांनी या विमानाचा वापर केला, त्या सर्व देशात जाण्याचे या अभियानांतर्गत ठरविण्यात आल्याचे या विमानाच्या पायलटने सांगितले. जवळपास ६२ वर्षांपूर्वी या विमानाने अखेरच्या वेळी भारतात उड्डाण घेतले होते. आज पुन्हा हे विमान भारताच्या आकाशात झेपावल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.