व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:58 PM2021-10-10T19:58:32+5:302021-10-10T19:58:45+5:30

मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (वय ४६) असे मृत घरमालकाचे नाव आहे. ते जरीपटक्यातील कस्तुरबानगरात राहत होते.

The landlord committed suicide after being harassed by a tenant; Incident in Nagpur | व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात

व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात

Next

नागपूर : भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने जरीपटक्यात एका घरमालकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गळफास लावण्यापूर्वी मृतकाने स्वत:चा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली आहे.

मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (वय ४६) असे मृत घरमालकाचे नाव आहे. ते जरीपटक्यातील कस्तुरबानगरात राहत होते. नास्ता सेंटर चालविणाऱ्या रिजवानी यांनी आरोपी राजेश उर्फ राजा नामोमल सेतिया (वय ४५) याला काही वर्षांपूर्वी दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपी राजेश मुकेश यांना घरभाडे देत नव्हता. त्याची मागणी केली असता तो शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. त्याचा मोठा भाऊ वेगवेगळ्या विभागात तक्रारी करून रिजवानी यांना त्रास देत होता. 

वारंवार होत असलेल्या वादामुळे रिजवानी यांनी आरोपींनासप्टेंबर २०१९ मध्ये आपले घर खाली करून मागितले. यावेळी आरोपीने त्यांना घर खाली करून देण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली. रिजवानी यांनी आरोपी राजाला ६० हजार रुपये दिले. आणखी ४.५० लाख रुपये मिळावे म्हणून आरोपी राजा रिजवानी यांचा छळ करीत होता, तर राजाचा मोठा भाऊ मूलचंदही त्याला साथ देत होता. त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे ६ ऑक्टोबरला सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. 

तत्पूर्वी रिझवानींनी स्वत:चा व्हिडिओ बनविला. त्यात आत्महत्येला आरोपी सेतिया बंधू जबाबदार असल्याचे म्हटले. रिजवानी यांनी त्यात एका वकिलाचेही नाव घेतले. हा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कशिश सुनील रिजवानी यांनी शनिवारी रात्री जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सेतिया बंधूविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते फरार असून, ठाणेदार वैभव जाधव आणि द्वितीय निरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच त्यांचे सहकारी आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपी राजा बुकी-

आरोपी राजा सेतिया हा बुकी असून, वाममार्गी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याने अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचीही चर्चा आहे. तो आणि त्याचा भाऊ अनेकांच्या विविध विभागात तक्रारी करून त्यांना त्रास देतात, असाही आरोप आहे.

Web Title: The landlord committed suicide after being harassed by a tenant; Incident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.