जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत ‘लॅण्डस्केप’ पेंटिंग्ज, स्केचचे प्रदर्शन
By admin | Published: May 27, 2016 02:51 AM2016-05-27T02:51:31+5:302016-05-27T02:51:31+5:30
स्थापत्यशास्त्रज्ञ श्रीकांत तनखीवाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे ‘लॅण्डस्केप’ या प्रदर्शनाचे आयोजन...
आवर्जून पाहावे असे काही..
नागपूर : स्थापत्यशास्त्रज्ञ श्रीकांत तनखीवाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे ‘लॅण्डस्केप’ या प्रदर्शनाचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता स्थापत्यशास्त्रज्ञ प्रकाश पांगारकर आणि इंटेरिअर डेकोरेटर संध्या पांगारकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे पेंटिंग्ज आणि स्केचेसचे प्रदर्शन असून यात रिअॅलिस्टीक आणि अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज सादर करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी ३० मे पर्यंत दुपारी ४ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत खुले राहिल. प्रदर्शनाला सर्व रसिकांनी भेट देण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे यांनी केले आहे.