सावनेर, काटोल, कळमेश्वरात बाधितांच्या संख्येत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:08 AM2021-03-16T04:08:53+5:302021-03-16T04:08:53+5:30
सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कामठी/रामटेक/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सोमवारपासून नागपूर शहरात लॉकडाऊन जाहीर ...
सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कामठी/रामटेक/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गत आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सोमवारपासून नागपूर शहरात लॉकडाऊन जाहीर झाले. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही कोरोना प्रतिबंधक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होताना दिसत आहे. यातूनच कोरोनाची साखळी विस्तार घेत आहे. सोमवारी जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत ३६१ रुग्णांची भर पडली. यातील १४५ रुग्ण एकट्या सावनेर तालुक्यातील आहेत. यात शहरातील ३१, तर ग्रामीण भागातील १४५ रुग्णांचा समावेश आहे.
काटोल तालुक्यात प्रथमच ६६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४५, तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरात पंचवटी येथे दहा, सरस्वतीनगर (६), तारबाजार (५), घोडे प्लॉट (३), रेल्वे स्टेशन, पाॅवर हाऊस, आयू.डी.पी. परिसर येथे प्रत्येकी दोन, तर पेठ बुधवार, रमण चांडकनगर, रामदेवबाबा ले-आउट, लाखोले ले-आउट, सरोदे ले-आउट, कुणबीपुरा, राऊतपुरा, धंतोली, पुरुषोत्तम मंदिर, शारदा चौक, अर्जुननगर, लक्ष्मीनगर, द्वारकानगरी, वडपुरा, काळे चौक येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये येनवा, आजनगाव, कोंढाळी, कचारी सावंगा येथे प्रत्येकी दोन, तर हरणखुरी, गोंडीदिग्रस, गोंडीमोहगाव, मोहखेडी, सोनोली, दिग्रस (बु.), पंचधार, चिखली, वंडली, रिधोरा, परसोडी, नांदोरा, गरमसूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यातही सोमवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. तालुक्यात ६७ जणांना कोरानाची लागण झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील २५, तर ग्रामीण भागात तेलकामठी येथे (१०), धापेवाडा बु. (६), पानउबाळी (४), तिष्टी (४), धापेवाडा, मोहपा, उबाळी येथे प्रत्येकी दोन, तर मडासावंगी, सिंधी, बोरगाव, वरोडा, तिडंगी, झिल्पी, तिष्टी खु., सावंगी, मांडवी, बुधला, सेलू, कोहळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४५२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात वानाडोंगरी येथील १५, इसासनी (६), हिंगणा (५), किन्ही धानोली, मोंढा, रायपूर व टाकळघाट येथे २, तर डिगडोह, नीलडोह व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
उमरेड तालुक्यात १९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १०, तर ग्रामीण भागातील ९ रुग्णांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात १७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरात गांधी वॉर्ड येथे दोन, तर महात्मा फुले वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, राधाकृष्ण वॉर्ड, रामालेश्वर वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात कांद्री माईन येथे २, तर मनसर, करवाही, परसोडा, शीतलवाडी, पाचगाव, मुसेवाडी, खैरी बिजेवाडा, बोथीयापालोरा, गर्रा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १२७७ कोरानाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १०८५ कोरोनामुक्त झाले, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला.
कामठी ग्रामीणमध्ये धोका वाढला
कामठी तालुक्यात ४९ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कामठी शहरात २२, कामठी कॅटोन्मेंट बोर्ड (४), तर ग्रामीण भागात येरखेडा येथे १०, कोराडी (४), खैरी (३), रनाळा (२), तर खसाळा, नांदा, भिलगाव, गुमथळा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.