हुई शाम उनका खयाल आ गया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:35 PM2020-08-13T12:35:56+5:302020-08-13T12:36:36+5:30

निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला. टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत..

Last evening he came up with the idea .. | हुई शाम उनका खयाल आ गया..

हुई शाम उनका खयाल आ गया..

Next

श्रेया अभिजीत सरनाईक
नागपूर 
दिवेलागणीची कातरवेळ. अस्तांचलाला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी जाता जाता रांगोळी सांडवलेली.. बहुतेक त्याच्या सप्त घोड्याच्य खुरांनी हा गोंधळ घातला असावा. त्याच्या रंगडबीतले जादुई केशरी, गुलाबी रंग असे आकाशाच्या लांबलचक फलाटावर उधळले गेले की थोडावेळ मस्त वाटते.
पुढच्या नीरव शांततेच्या आधीची ही रंगपंचमीच जणू. मग दिवसभर काम करून थकलेला हा कुटुंबप्रमुख लगबगीने आपले सगळे आटोपून घराकडे जायला निघतो. सगळी किरणेही आपले क्षितिज विस्तारणारे पंख आवरून गाढ झोपी जातात. अगदी छोट्या बाळासारखी पाय मुडपून झोपतात.
निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला.
टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत.. पूर्ण चमचमणारं सौंदर्य घेऊन कॅटवॉक करत येतात आणि मिरवतात.
अशी एखादी दूरस्थ चांदणी एखाद्याचे देवालय असू शकते.
या संधाकाळच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये उदासीनताही सोबत येते. पाखरथवे अंधार व्हायच्या आधीच परतू लागली असतात. या पाखरथव्यांना कधी बेपत्ता दिशांचे धोके होत नसतील का... चोचीत दाणे घेऊन ही पाखरे दुसºया दिवशीची स्वप्न पंखांमध्ये भरून घरट्याकडे परततात. एक संध्याछाया गडद दाटून येते. एखाद्या काळ््या शाईची दौत अलगद कलंडावी असा अंधार हळूहळू पसरत जातो. काजव्यांचे झाड भरत जाते. आकाशातले तुटलेले तारे पुन्हा जन्म घेत असावेत का काजवा होऊन?
काजवा क्षणभर चमकावा तशी एखादी आठवण चमकून जाते. या आठवणी हत्तींच्या पायासारख्या असतात. खोलवर रुतून बसणाºया, न बोलताच हटकून येणाºया.
आयुष्यातून निघून गेलेले क्षण, माणसे मग या क्षणांची दावेदार असतात. जळण्यासाठी दिव्यांची गरजच ती काय..
शाम होते ही चिरागों को बुझा देता हूँ.
एक दिल ही काफी है तेरी याद में जलाने के लिये

कायमचे मुक्कामाला निघून गेलेले क्षण, आठवणी. त्या आठवणींनी धरून ठेवलेली माणसं पुन्हा वर्तमााच्या चिमटीत धरता येत नाहीत.
मग वाटतं,
हुई शाम उनका खयाल आ गया
वही जिंदगी का सवाल आ गया..
वाºयाच्या मंद झुळुकीसोबत दूर कुठेतरी गाण्याचे सूर ऐकू येत आहेत..
वो दिल कहाँ से लाऊं.. तेरी याद जो भुला दे..
खरंच असं काळीज कुठून आणायचं असतं.

 

 

Web Title: Last evening he came up with the idea ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग