शास्ती माफीचे अखेरचे पाच दिवस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:48+5:302021-02-10T04:08:48+5:30
१४ फेब्रुवारीपर्यंत मुदत : थकबाकी भरण्याचे आवाहन लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर ...
१४ फेब्रुवारीपर्यंत मुदत : थकबाकी भरण्याचे आवाहन
लोकमत न्यूज् नेटवर्क
नागपूर : थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेची मुदत संपत आली आहे. अखेरचे ५ दिवस शिल्लक आहेत. मालमत्ता कर ५० टक्के शास्ती माफीचा १४ फेब्रुवारी अखेरचा दिवस आहे. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरून ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा व आपली पाटी कोरी करावी असे आवाहन मनपा महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपाने अभय योजना जाहीर केल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मनपा प्रशासनाने मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. १४ फेब्रुवारी दरम्यान थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरला तरच शास्तीत ५० टक्के सवलत मिळणार आहे.
...
पाणी कराच्या शास्तीत ७० टक्के सवलत
थकीत मालमत्ता व पाणी कर भरण्यासाठी मनपाद्वारे १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू आहे. पाणी कराच्या थकीत रक्कमेवरील शास्तीत ७० टक्के माफीच्या दुसरा टप्पा १ फेब्रुवारीपासून सुरू झाला. २२ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत थकीत पाणी कर मनपाकडे जमा करुन शास्तीत ७० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.