अखेर होणार नागपूर जि.प. ची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 08:00 PM2020-07-22T20:00:13+5:302020-07-22T20:01:20+5:30

कोरोनामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या ५ महिन्यापासून झाली नव्हती. सरकारने अनलॉक केल्यानंतर अध्यक्षांच्या पुढाकाराने सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला. २४ जुलै तारीखही निश्चित झाली. पण ऐन सभेच्या तोंडावर जि.प. अध्यक्षांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे सभा होणार की नाही, यावरून आठवड्याभरापासून तर्कवितर्क सुरू होते. अखेर प्रशासनाने सभा घेण्याचा निर्णय घेतला. सभेला अध्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याने उपाध्यक्षांना सभाध्यक्षांचा पदभार सोपविण्याचे निश्चित झाले.

Lastly Nagpur ZP General meeting | अखेर होणार नागपूर जि.प. ची सर्वसाधारण सभा

अखेर होणार नागपूर जि.प. ची सर्वसाधारण सभा

Next
ठळक मुद्देउपाध्यक्ष सांभाळणार सभाध्यक्षांचा पदभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या ५ महिन्यापासून झाली नव्हती. सरकारने अनलॉक केल्यानंतर अध्यक्षांच्या पुढाकाराने सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला. २४ जुलै तारीखही निश्चित झाली. पण ऐन सभेच्या तोंडावर जि.प. अध्यक्षांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे सभा होणार की नाही, यावरून आठवड्याभरापासून तर्कवितर्क सुरू होते. अखेर प्रशासनाने सभा घेण्याचा निर्णय घेतला. सभेला अध्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याने उपाध्यक्षांना सभाध्यक्षांचा पदभार सोपविण्याचे निश्चित झाले.
सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे अनेक कामे प्रलंबित असल्याची ओरड सदस्यांकडून होत होती. त्यामुळे सभा घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नही सुरू होते. लॉकडाऊनच्या काळातसुद्धा प्रयत्न करण्यात आले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. अनलॉक झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी मागण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर सभागृह उपलब्ध होत नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वनामतीचे सभागृह निश्चित झाले. त्यानुसार २४ जुलै ही तारीख ठरली. पण जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव झाला. अध्यक्ष रश्मी बर्वे यांना क्वारंटाईन व्हावे लागले. त्यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घरातच राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अध्यक्षांनी सभा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला. पण इतर पदाधिकाऱ्यांसह विरोधी पक्ष आणि इतर सदस्यही सभा घेण्याच्या पक्षात होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार सभेची नोटीस काढल्यानंतर केवळ अध्यक्ष नसेल तर सभा रद्द करता येत नाही. कायद्याच्या या अडचणी लक्षात घेता, प्रशासनानेसुद्धा सकारात्मकता दर्शविली. अखेर २४ जुलै रोजी १ वाजता वनामतीमध्ये सभा घेण्याचे निश्चित झाले.

प्रशासनाने केली सभागृहाची पाहणी
बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईओ, अतिरिक्त सीईओ, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभागृहाची पाहणी केली. सदस्यांबरोबरच अधिकाऱ्यांची बैठकीची व्यवस्था, पदाधिकाऱ्यांची बैठकीची व्यवस्था जाणून घेतली. सर्व नियम व्यवस्थित पाळले जातील, याचा आढावा घेतला.

Web Title: Lastly Nagpur ZP General meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.