लता मंगेशकर होस्टेलवर मारहाण
By admin | Published: September 28, 2015 03:09 AM2015-09-28T03:09:14+5:302015-09-28T03:09:14+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका गटातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्येच हल्ला चढवला.
विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद : सहा विद्यार्थी गजाआड
नागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका गटातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्येच हल्ला चढवला. शनिवारी रात्री १० च्या सुमारास एमआयडीसीतील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या होस्टेलवर ही घटना घडली.
अरुण भीमराव मोराळे (वय २४) आणि विशाल कंठारे (वय २३) हे दोघे लता मंगेशकरच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असून, ते एनआरआय होस्टेल, रूम नं. एफ ७ मध्ये राहतात. त्यांच्या दुचाकीचा कट लागल्यामुळे शशांक नावाच्या विद्यार्थ्यासोबत या दोघांचा वाद झाला होता. त्यामुळे या दोघांना धडा शिकविण्यासाठी याच होस्टेलवर राहणारे आरोपी प्रवीण रामप्रीत मिश्रा, राहुल सुमीरसिंग डांगर, वनीत भारतभूषण अरोडा, निशांत अनिलकुमार डांगी, बीरकंवर सुखवनसिंग अय्यर, यशइंदू युवराज फुल्लर हे सर्व शनिवारी रात्री अरुण आणि विशालच्या रूमवर चालून गेले. त्यांनी या दोघांना शिवीगाळ करीत शशांकसोबत का भांडण केले, असा सवाल करून जोरदार मारहाण केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकारामुळे होस्टेल परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अरुण मोराळेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. या सर्वांना अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)