स्व.प्रा.श्याम ठवरे युवा फाऊंडेशन व द ग्रेट शिवराजे फाऊंडेशन, वाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:04+5:302021-07-12T04:07:04+5:30

सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर व परिचारिकानी केले रक्तदान वाडी : ‘लोकमत रक्ताचं नातं’या मोहिमेंतर्गत स्व.प्रा. श्याम ठवरे युवा फाऊंडेशन, ...

Late Prof. Shyam Thaware Youth Foundation and The Great Shivraje Foundation, Wadi | स्व.प्रा.श्याम ठवरे युवा फाऊंडेशन व द ग्रेट शिवराजे फाऊंडेशन, वाडी

स्व.प्रा.श्याम ठवरे युवा फाऊंडेशन व द ग्रेट शिवराजे फाऊंडेशन, वाडी

Next

सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर व परिचारिकानी केले रक्तदान

वाडी : ‘लोकमत रक्ताचं नातं’या मोहिमेंतर्गत स्व.प्रा. श्याम ठवरे युवा फाऊंडेशन, द ग्रेट शिवराजे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वाडी येथील वेल्ट्रीट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तीत वाडी शहर, धामना आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डाॅक्टर व परिचारिकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील, माजी उपनगराध्य नरेश चरडे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती कल्पना सकदेव, सरीता यादव, दिनेश कोचे, प्रकाश कोकाटे, संतोष केचे, आनंद कदम, संजय अनासाने, विजय मिश्रा, अखिल पोहनकर, क्रांती सिंग, हिमांशू आर्या, डॉ. राहुल ठवरे, प्रवीण गिरीपुंजे,पं.स. सदस्य अविनाश पारधी, धामना येथील सरपंच वंदना थुटूरकर, पत्रकार सुरेश फलके, जितेंद्र उके प्रामुख्याने उपस्थित होते.

शिबिरात सहभागी रक्तदात्यांना वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांचे हस्ते प्रमाणपत्र व भेट वस्तू प्रदान करीत गौरवान्वित करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विपीन समर्थ, डॉ. राजेश रवंदे, डॉ. अश्विनी ठवरे, राजेश ढोले, शुभम डवरे, लोकेश जगताप, सचिन कापगते, गौरव गाणार, जय वासनिक, अरुण कराळे, रवी धुर्वे, सतीश लांजेवार, प्रतीक फलके, माही जेठवा, शोएब शेख, उमेश गिरीपुंजे, विशाल जोध, अनिकेत भगत, निशांत झाडे यांनी सहकार्य केले.

110721\img-20210711-wa0230.jpg

फोटो

Web Title: Late Prof. Shyam Thaware Youth Foundation and The Great Shivraje Foundation, Wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.