Latur: हातभट्टी अड्ड्यावर छापा; ४१०० लिटर रसायन जप्त, सात जणांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: March 24, 2024 12:01 AM2024-03-24T00:01:12+5:302024-03-24T00:01:30+5:30
Latur: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली. यावेळी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे ४ हजार १०० लिटर रसायनसह १ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सात जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील काैळखेड आणि नागलगाव परिसरात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यांच्या पथकाला साेबत घेत एकाच वेळी दाेन्ही ठिकाणच्या हातभट्टी अड्ड्यावर शनिवारी छापा मारला. यामध्ये १ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टी निर्मिती करण्यासाठी लागणारे ४ हजार १०० लिटर रसायन, ७४ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई उदगीर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक एन.पी. रोठे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान जे.आर. पवार, एस.जी. बागलवाड, दुय्यम निरीक्षक आर.के. मुंढे, पोलिस काॅन्स्टेबल नामदेव धुळशेट्टे, पोलिस नाईक नाना शिंदे, एन.एस. चेवले, लटपटे, रवी फुलारी, चालक वि.वि. परळीकर, महिला कर्मचारी आर्या यांच्या पथकाने केली.