दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलणार हास्य

By admin | Published: May 17, 2017 02:09 AM2017-05-17T02:09:21+5:302017-05-17T02:09:21+5:30

अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय

Laughing at the face of non-toothless people | दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलणार हास्य

दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलणार हास्य

Next

शासकीय दंत रुग्णालय : कृत्रिम दात तयार करणारे आले ‘कॅडकॅम’ यंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ५५ लाख रुपयांची ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत्रिम दात तयार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, पूर्वी कृत्रिम दातासाठी आठवड्याची प्रतीक्षा करावी लागायची.
विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील रुग्णांसाठी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालय आशेचे किरण ठरले आहे. दातांच्या वाढत्या समस्या, वेडेवाकडे निघालेले दात, दात पडल्यानंतर कृत्रिम दातांचा वापर आदी समस्यांवर मात करण्यासाठी दंत रुग्णालयात अत्याधुनिक ‘कॅडकॅम’ यंत्राची गरज होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने या यंत्राच्या खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु, निधीअभावी वा इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव शासनदरबारी पडून होता. दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडे (डीपीसी) विकास कामे व यंत्र खरेदीसाठी निधीचा प्रस्ताव दंत प्रशासनाकडून पाठविला जात होता. २०१६-१७ मध्येही हा प्रस्ताव पाठविण्यात आला. या यंत्रासाठी ‘डीपीसी’ने १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागानेही याला परवानगी देताच खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन हे उपकरण ११ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले.

रुग्णांसाठी फायद्याचे
‘कॅडकॅम’ या यंत्रामुळे काही मिनिटांमध्येच नवीन दात तयार होतो. नुकत्याच केलेल्या प्रात्यक्षिकामध्ये एका मुलीला नवीन दात बसविण्यात आला आहे. लवकरच या यंत्राचे अधिकृत उद्घाटन करून रुग्णसेवेत दाखल होईल. कृत्रिम दाताच्या शुल्काबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
-डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता, शा. दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Laughing at the face of non-toothless people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.