हसत खेळत शिक्षण : दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 08:31 PM2019-06-07T20:31:55+5:302019-06-07T20:34:01+5:30

मुलांना शिक्षण हे ओझं वाटू नये. हसत खेळत त्यांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी, अशी शासनाची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आता प्राथमिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही बदलत आहेत. यावर्षीच्या सत्रापासून दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत आहे. यात चला मुलांनो खेळत खेळत शिकू, असा बदल अभ्यासक्रमात घडवून आणला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.

Laughing playing Learning : The change in the class second curriculum | हसत खेळत शिक्षण : दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल

हसत खेळत शिक्षण : दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन शैक्षणिक सत्राला २६ जूनपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलांना शिक्षण हे ओझं वाटू नये. हसत खेळत त्यांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी, अशी शासनाची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आता प्राथमिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही बदलत आहेत. यावर्षीच्या सत्रापासून दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत आहे. यात चला मुलांनो खेळत खेळत शिकू, असा बदल अभ्यासक्रमात घडवून आणला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.
येत्या २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी. मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी. यासाठी नवनवीन प्रयोग अभ्यासक्रमातही करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक सत्रात इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, बालभारती, गणित, माय इंग्लिश, खेळू बोलू शिकू आदी पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमात असणार आहेत. पाऊस फुले, फुलांचे संमेलन, मंगळवारची शाळा, मांजरांची दहीहंडी, मोरपिसारा, चित्रवाचन, खेळ खेळूया, नक्कल करूया, ओळख भाज्यांची आदी रंगीत चित्रांनी सजलेल्या पाठ्यक्रमांचा समावेश अभ्यासक्रमात असून, चित्रांच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने दैनंदिन व्यवहार आणि दिनचर्या शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांना अभ्यासक्रमही सोपा वाटावा, या हेतूने अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांच्या रचनेतही बदल करण्यात आले आहेत. आकर्षक मांडणी आणि रंगीबेरंगी चित्रांचा, कार्टून्स आदींचा वापर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Laughing playing Learning : The change in the class second curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.