दात नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर फुलत आहे हसू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:47 AM2018-05-05T00:47:55+5:302018-05-05T00:48:08+5:30
अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहºयावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ७१ लाख रुपयांचे ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत्रिम दात तयार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या यंत्रावरील उपचाराचे दर निश्चित झाले नव्हते, तब्बल आठ महिन्यानंतर शासनाने आता दर निश्चित करून दिल्याने अत्याधुनिक उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातात किंवा रोगामुळे दात गमावून बसलेल्यांच्या चेहºयावर पुन्हा हसू फुलविण्याच्या प्रयत्नाला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यश आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक असलेली १ कोटी ७१ लाख रुपयांचे ‘कॅडकॅम’ नावाचे उपकरण उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कृत्रिम दात तयार करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या यंत्रावरील उपचाराचे दर निश्चित झाले नव्हते, तब्बल आठ महिन्यानंतर शासनाने आता दर निश्चित करून दिल्याने अत्याधुनिक उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील रुग्णांसाठी नागपुरातील शासकीय दंत रुग्णालय आशेचे किरण ठरले आहे. दातांच्या वाढत्या समस्या, वेडेवाकडे निघालेले दात, दात पडल्यानंतर कृत्रिम दातांचा वापर आदी समस्यांवर मात करण्यासाठी दंत रुग्णालयात अत्याधुनिक ‘कॅडकॅम’ यंत्राची गरज होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने या यंत्राच्या खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु, निधीअभावी वा इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव शासनदरबारी पडून होता. दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडे (डीपीसी) विकास कामे व यंत्र खरेदीसाठी निधीचा प्रस्ताव दंत प्रशासनाकडून पाठविला जात होता. २०१६-१७ मध्येही हा प्रस्ताव पाठविण्यात आला. या यंत्रासाठी ‘डीपीसी’ने १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागानेही याला परवानगी देताच खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन हे उपकरण ११ मे २०१७ रोजी रुग्णालयात दाखल झाले. परंतु, या यंत्रावर होणाºया विविध उपचाराचे दर शासनाकडून ठरविण्यात आले नव्हते. परिणामी, प्रत्यक्ष लाभापासून रुग्ण वंचित होते. दरम्यान, शुल्क ठरविण्याबाबत अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी स्वत:हून पाठपुरावा केल्याने शासनाने अखेर नवे दरपत्रक लागू केले.
‘कॅडकॅम’वर होणारे प्रकार
१) अॅक्रॅलिक क्रोन
२) मेटल क्रोन
३) आॅल सेरामिक क्रोन
४) आॅल सेरामिक क्रोन (लि.)
५) मेटल बार मिलिंग
६) कस्टमाईज्ड इम्प्लांट
७) झिरकोनिया क्रोन
८) कास्ट पार्टिअल डेंन्चर
९) कम्प्लेंट डेंचर प्रोस्थिसीस २००० रु.
रोज चार रुग्णांवर अत्याधुनिक उपचार
शासकीय दंत रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना ‘कॅडकॅम’ची मोठी मदत मिळत आहे. तुर्तास चार रुग्णांना याचा लाभ मिळत असलातरी भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दात गमावून बसलेल्यांसाठी हे उपकरण एक वरदान ठरत असून कृत्रिम दात बसविल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू समाधान देणारे आहे.
डॉ. सिंधू गणवीर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय