अन् सायकलचे पैसे मिळताच फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:02 PM2020-05-15T21:02:55+5:302020-05-15T21:06:57+5:30

रेल्वे स्टेशनवरून हिमाचलकडे जाण्यास गाडी मिळाल्याचा आनंद होता पण त्यापेक्षा हैदराबादहून प्रवास करण्यासाठी घेतलेल्या नव्या सायकली सोडून जाण्याचे दु:ख अधिक होते. मात्र पर्याय नव्हता कारण पुन्हा सायकलने प्रवास करण्याचे त्राण अंगात नव्हते. जड अंत:करणाने सायकली सोडून ते गाडीत बसण्यासाठी निघाले. इतक्यात मागावून कुणीतरी हाक दिली आणि सायकली घेतल्याचे सांगत हातावर रोकड ठेवली. सायकल जाण्याचे दु:ख क्षणात विरले आणि चेहऱ्यावर हास्य उमटले.

Laughter blossomed as soon as got the money for the bicycle | अन् सायकलचे पैसे मिळताच फुलले हास्य

अन् सायकलचे पैसे मिळताच फुलले हास्य

googlenewsNext
ठळक मुद्देहिमाचलला जाणाऱ्या तरुणांची मदत : वेदनेवर फुंकर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे स्टेशनवरून हिमाचलकडे जाण्यास गाडी मिळाल्याचा आनंद होता पण त्यापेक्षा हैदराबादहून प्रवास करण्यासाठी घेतलेल्या नव्या सायकली सोडून जाण्याचे दु:ख अधिक होते. मात्र पर्याय नव्हता कारण पुन्हा सायकलने प्रवास करण्याचे त्राण अंगात नव्हते. जड अंत:करणाने सायकली सोडून ते गाडीत बसण्यासाठी निघाले. इतक्यात मागावून कुणीतरी हाक दिली आणि सायकली घेतल्याचे सांगत हातावर रोकड ठेवली. सायकल जाण्याचे दु:ख क्षणात विरले आणि चेहऱ्यावर हास्य उमटले.
नागपूर रेल्वे स्टेशनवरचा हा प्रसंग. शोएब मेमन या तरुणाच्या पुढाकाराने अ‍ॅड. रेखा बाराहाते व नीलेश यांनी या तीन मित्रांच्या तीन सायकली मदत म्हणून विकत घेतल्या. याबाबत अधिक माहिती म्हणजे, हैदराबाद येथे कंपनीत कामाला असलेले हिमाचल प्रदेश व उत्तराखंडचे प्रेम कुमार, विवेक व अजय कुमार हे तीन तरुण ८ मे रोजी सायकलने निघाले. त्यांनी वेळेवर नवीन सायकल घेतल्या. आठवडाभर प्रवास करीत ते १५ रोजी नागपूरला पोहचले. यांच्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. नागपूर स्टेशनवरून उधमपूरसाठी ट्रेन जाणार होती. ही गाडी उत्तराखंड, हिमाचल होत जाते. याबाबत पांजरी टोल नाक्यावर त्यांना माहिती मिळाली. सायकलने पुन्हा प्रवास करण्याची हिंमत होत नसल्याने त्यांनी ट्रेनने जाण्याचा विचार केला व नोंद केली. मात्र सायकल नेता येत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. त्यांना सायकली येथेच सोडून जावे लागणार होते. पांजरी नाक्यावर स्थलांतरित मजुरांना भोजन, वैद्यकीय सुविधा व सर्व प्रकारची मदत देणाऱ्या ‘टूगेदर वुई कॅन’ ग्रुपच्या शोएब मेमन यांनी तरुणांची व्यथा ओळखत नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या सायकली ठेवल्या व तेवढी किंमत दिली. यामुळे त्या तरुणांना एक समाधान मिळाले आणि ते आनंदाने आपल्या प्रवासाला लागले.
वडील जिवंत असल्याचे कळताच ढसाढसा रडले
शोएब यांनी वेदनांच्या अनेक कथा ‘लोकमत’शी बोलताना उलगडल्या. वाराणशी येथील राजेंद्र शर्मा नामक ज्येष्ठ व्यक्ती पिंडदान करायला कन्याकुमारीला गेले होते. अचानक लॉकडाऊन लागला आणि ते अडकले. ते मधुमेह व टीबीचे रुग्ण होते. रेल्वेस्थानकावर रात्री झोपले असता चोरट्यानी त्यांचा मोबाईल व पैसे चोरून नेले. २५ मार्चची ही घटना. जवळ पैसे नाहीत आणि कुणाचा संपर्क आठवत नव्हता. कधी पायी तर कधी एखाद्या वाहनाची मदत घेत ते २९ एप्रिल रोजी नागपूरला पोहचले. या काळात त्यांना कुठेही मधुमेह व टीबीची औषध मिळाली नसल्याने त्यांची अवस्था नाजूक झाली होती. शोएब व त्यांच्या सहकार्यांनी आधी त्यांच्या औषधांची व्यवस्था केली. नंतर त्यांनी सांगितलेल्या पत्त्याजवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधून घरच्यांना माहिती देण्यास सांगितले. इतक्या दिवस कुठलाही संपर्क न झाल्याने वडील गमावल्याच्या दु:खात असलेल्या कुटुंबाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अर्धा तास मुलगा व कुटुंबाशी बोलताना दोन्हीकडे अश्रूंची वाट मोकळी झाली. हे दृश्य आम्हालाही भावुक करून गेल्याचे शोएब यांनी सांगितले.

Web Title: Laughter blossomed as soon as got the money for the bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.