अपघातमुक्त नागपूर मॉडेलचा शुभारंभ

By admin | Published: May 16, 2017 02:17 AM2017-05-16T02:17:03+5:302017-05-16T02:17:03+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ‘अपघातमुक्त नागपूर मॉडेल’चा शुभारंभ ...

The launch of the accident-free Nagpur model | अपघातमुक्त नागपूर मॉडेलचा शुभारंभ

अपघातमुक्त नागपूर मॉडेलचा शुभारंभ

Next

आयटी पार्क मार्गावर जनजागृती अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ‘अपघातमुक्त नागपूर मॉडेल’चा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सोमवारी बंडू सोनी ले-आऊ ट ते आयटी पार्क मार्गावर करण्यात आला.
यानिमित्ताने आयटी पार्क मार्गावर जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक प्रमोद तभाने, दिलीप दिवे, सोनाली कडू, जीवन सुरक्षा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष राजू वाघ, अभियान प्रमुख नितीन महाजन, प्रदीप येळणे, रवींद्र देशपांडे, ल.ना. भोळे, मोना रामाणी, अनसूया गुप्ता, शैलजा चहांदे, एक्सपर्ट फाऊं डेशनचे शरद मोरे, सुशील मौर्य, आशिष अटलोये, निशांत बिला, प्रफुल्ल मोरे, राजेंद्र वानखेडे व मदन आळशी यांच्यासह प्रकल्पाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटनानंतर नंदा जिचकार यांनी काही कुटुंबांना भेट दिली. आई, वडील व मुलाशी त्यांनी संवाद साधला. अपघात टाळा, वाहतूक नियम पाळणे ही जीवनपद्धती बनवा, आपले वाहन रस्त्यावर बेशिस्तपणे न लावता पार्किंगमधेच लावा, वाहतुकीला अडचण ठरू नका असे आवाहन त्यांनी केले.
अपघातमुक्त नागपूरची संकल्पना अभिनव पद्धतीने प्रत्यक्षात उत्तरविण्याचा हा उत्तम प्रयत्न असल्याचे सांगून महापौरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमांतर्गत हाती घेतलेल्या जनजागृती अभियानाला महापालिका सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Web Title: The launch of the accident-free Nagpur model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.