नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शाखांचा शुभारंभ
By admin | Published: September 24, 2015 03:28 AM2015-09-24T03:28:04+5:302015-09-24T03:28:04+5:30
मल्टीस्टेट शेड्यूल्ड नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शाखात आणखी पाच शाखांची भर पडणार असून, शहरातील शास्त्री लेआऊट खामला, ..
नागपूर : मल्टीस्टेट शेड्यूल्ड नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या शाखात आणखी पाच शाखांची भर पडणार असून, शहरातील शास्त्री लेआऊट खामला, भगवाननगर रामेश्वरी, पुणे, भंडारा आणि छत्तीसगडमधील दुर्ग येथे प्रत्येकी एक शाखा मिळून सर्व शाखांचे कामकाज २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नागपुरातील खामला शाखा प्लॉट नं. ४३, त्रिशरण लेआऊट, मिलेनियम टॉवर, सोमलवार शाळेसमोर सुरू होत असून, भगवाननगर शाखा बांते सुपर बाजाराच्यावर, बँक कॉलनी, भगवाननगर येथे सुरू होत आहे. राज्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र पुणे येथील शाखा कोथरुड येथे करिष्मा सोसायटीजवळ सुरू होत असून, यानिमित्ताने कोथरुड परिसरातील नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहे. विदर्भात शाखांचे जाळे वाढवीत भंडारा येथे नशीने सदन, विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनी, जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यासमोर तकीया वॉर्ड, भंडारा येथे सुरू होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूरनंतर दुर्ग येथे बँकेची शाखा सुरू होत असून शंकरनगर रोड, तरुण अॅडलॅबसमोर देवांगण यांच्या जागेत ही शाखा सुरू होत आहे. पुणे तसेच खामला शाखेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४, भगवाननगर शाखेची सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० आणि दुर्ग शाखेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० राहणार आहे. बँकेची प्रस्तावित सहावी शाखा मेडिकल रोड चंदननगर येथे नवरात्र काळात सुरू होत आहे. या विस्तारानंतर बँकेच्या एकूण ४५ शाखा झाल्या आहेत. सर्व शाखात लॉकर्सची सुविधा, एटीएम, कॅश ड्रॉप सेवा, एनईएफटी, अत्याधुनिक बँकिंगची सुविधा आहे. ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक मंडळातर्फे अध्यक्ष संजय भेंडे, उपाध्यक्ष राजेश लखोटिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गोडबोले यांनी केले आहे. (वा.प्र.)