‘ये दिल का मामला है’ लोगोचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:28 AM2019-07-27T00:28:15+5:302019-07-27T00:29:33+5:30
लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
‘ये दिल का मामला है’ या उपक्रमांतर्गत विदर्भातील २६ ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लोगोचे लोकार्पण नुकतेच सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आले. लोकमत वृत्तपत्र समूहाचा एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या प्रसंगी प्रामुख्याने माधवबाग साने केअरचे सीएसआर प्रमुख मिलिंद सरदार उपस्थित होते. सोबतच माधवबाग कोंढाळी हॉस्पिटलचे ‘ओपीडी’ प्रमुख डॉ. अंजली तिवारी, पंचकर्म प्रमुख डॉ. रितु बांगरे, विदर्भ क्लिनिक माधवबागचे रिजनल हेड श्रेया पांडे आणि मीडिया व्यवस्थापक मंगल लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमात माधवबाग साने केअरचे पुस्तक ‘आरोग्य संस्कार’ याचे प्रकाशनही करण्यात आले. आरोग्य शिबिराचा लाभ लोकमत सखी मंच सदस्य, त्यांचे कुटुंब व जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहिती ‘लोकमत’मधून दिली जाणार असल्याचेही संयोजकांनी कळविले आहे.