लोकमत रक्ताचं नातं अभियानास शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:50+5:302021-07-03T04:06:50+5:30
देशाच्या सुरक्षेत सदैव तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनीही लोकमतच्या या अभियानात सहयोग दिला. यावेळी त्यांनी देशसुरक्षेसाठी युवकांना रक्तदान करून राष्ट्रीय ...
देशाच्या सुरक्षेत सदैव तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनीही लोकमतच्या या अभियानात सहयोग दिला. यावेळी त्यांनी देशसुरक्षेसाठी युवकांना रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले
--------------
फर्स्ट टाइम डोनर्समध्ये उत्साह ()
लोकमत रक्ताचं नातं या अभियानात फर्स्ट टाइम डोनर्सचा उत्साह दिसून येत होता. अनेक युवक-युवतींनी यावेळी प्रथमच रक्तदान केले. फराह फिरदोस मिर्झा या प्रथमच रक्तदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या युवतीने रक्तदानाच्या या महायज्ञात युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले.
--------------------------
लोकमतने नेहमीच वास्तविकता मांडली
- स्व. जवाहरलाल दर्डा यांनी उभारलेल्या लोकमत नावाच्या वृक्षाचा पसारा विजय दर्डा यांनी देशभर केला आहे. त्यांच्या नेतृत्वात वृत्तपत्राच्या माध्यमातून गरीब, पीडित व निम्न स्तरातील नागरिकांना न्याय मिळाला आहे. ‘मीडिया ट्रायल’च्या वावटळीत लोकमतने अनेक भ्रामक कल्पनांना दूर सारत समाजापुढे वास्तविकता मांडली, असे मत पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
------------------
डॉ. संजय देवतळेंचा सत्कार
१०४ वेळा रक्तदान करणारे आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. एका डॉक्टरने स्वत:च्या कर्तृत्वातून लोकांना प्रेरणा देणे व रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे, ही एक विशेष कामगिरी असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
रक्तदानासाठी दात्यांचा उत्साह
- रक्तदान उपक्रमाचा शुभारंभ होण्यापूर्वीपासूनच रक्तदात्यांचा उत्साह दिसून येत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सगळे दंडक पार पाडत दात्यांना रक्तदानासाठी सज्ज केले जात होते. दिवसभरात शेकडो दात्यांनी आपले कर्तव्य बजावले.
-----------------
लोकमतचा उपक्रम माईलस्टोन ठरेल
- सबंध राज्यभर एकाच वेळी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाविषयी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. राज्यात सद्यस्थितीत असलेला रक्ताचा तुटवडा बघता, हा उपक्रम रक्तदानाच्या क्षेत्रात एक माईलस्टोन ठरेल, असा आशावादही व्यक्त केला जात होता.
................