हिरवी मिरची खरेदीला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:05+5:302020-12-08T04:08:05+5:30
महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष विजय खवास यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीला सुरुवात करण्यात आली. कुही तालुक्यातील मांढळ परिसर ...
महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष विजय खवास यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीला सुरुवात करण्यात आली. कुही तालुक्यातील मांढळ परिसर मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात मिरचीचे पीक राेग व किडींना बळी पडत असल्याने मिरचीचा उत्पादनखर्च वाढला आहे. बाजारात कमी भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मिरचीला पर्यायी पीक शाेधायला सुरुवात केली. त्यामुळे तालुक्यातील मिरची लागवड क्षेत्र कमी झाले आहे. या भागातील शेतकरी पूर्वी लाल मिरची विकायचे. दाेन वर्षांपासून ते हिरवी मिरची विकायला लागले.
हिरची मिरची मांढळ बाजारपेठेत खरेदी केली जात नसल्याने ते माैदा बाजारपेठेत नेऊन विकायचे. यावर्षीपासून मांढळ बाजार समितीत हिरवी मिरची खरेदीला सुरुवात झाल्याने तालुक्यातील मिरची उत्पादकांची साेय झाली आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती मनाेज तितरमारे, उपसभापती महादेव जीभकाटे, हरीश कढव, नामदेव बुराडे, संजय भाेतमांगे, माेहन मते, सुधीर लुचे, प्रमाेद मुटकुरे, बबन गायधने, माेरेश्वर बाळबुद्धे, भूषण लांबट, सचिव अंकुश झंझाळ, नरेश कढव, साेमेश्वर लुटे यांच्यासह बाजार समितीचे संचालक, व्यापारी व शेतकरी उपस्थित हाेते.