चोरी गेलेल्या दुचाकीचा लावला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:49+5:302021-08-22T04:11:49+5:30
नागपूर : चोरी गेलेली दुचाकी घेऊन फिरत असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारने रंगेहात पकडले आहे. ...
नागपूर : चोरी गेलेली दुचाकी घेऊन फिरत असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारने रंगेहात पकडले आहे. गुन्हे शाखेचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत होते. दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यातील होंडा ॲक्टिव्हा क्रमांक एम.एच. ४९, एस-११३६ किंमत ५० हजार ही गाडी एका विधी संघर्षग्रस्त बालकाने चोरी केली असून, तो पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी येथे फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने शनिवारी सकाळी १०.३० वाजता भांडेवाडी येथील लाल शाळेजवळील चौकात या बालकास गाडीसह ताब्यात घेतले. ही गाडी आपण लाडपुरा वस्तीतील एका घरासमोरून चोरी केल्याची कबुली त्याने दिल्यामुळे विधी संघर्षग्रस्त बालकास गाडीसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त भीमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, ओमप्रकाश सोनटक्के, उपनिरीक्षक अतुल इंगोले, रवींद्र पानबुडे, सतीश ठाकरे, युवानंद कडु, बजरंग जुनघरे, पुरुषोत्तम काळमेघ, दीपक चोले, विलास चिंचुलकर, स्वप्निल अमृतकर, महेश काटवले, नरेंद्र बांते, श्रीकांत मारवाडे यांनी पार पाडली.
.............