कुत्र्यांच्या संख्या निर्मूलनात कायदा व श्वानप्रेमींचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:18+5:302021-09-16T04:11:18+5:30

श्वानांची दहशत : भाग 7 गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यावरील नियंत्रण ...

Law and dog lovers obstacles in eliminating the number of dogs | कुत्र्यांच्या संख्या निर्मूलनात कायदा व श्वानप्रेमींचा अडसर

कुत्र्यांच्या संख्या निर्मूलनात कायदा व श्वानप्रेमींचा अडसर

Next

श्वानांची दहशत : भाग 7

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यावरील नियंत्रण हे नागपूरसारख्या महानगरात आव्हान आहे. यात भरीसभर कायदा आणि श्वानप्रेमींचा नसबंदी मोहिमेला विरोध त्यांच्या संख्यावाढीच्या नियंत्रणात अडसर ठरत आहे.

भटक्या कुत्र्यांना उपचारासाठी किंवा नसबंदीसाठी पकडल्यावर नंतर पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासातच सोडावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा १९ डिसेंबर २००८ मधील निर्णय आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया विरुद्ध पीपल्स फॉर ॲनिमल्स ऑफ सोसायटी अशा खटल्यात हा निर्णय झाल्याने यातील आदेशाचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे. यानुसार नागपुरात महापालिका हद्दीत कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यासाठी खासगी संस्थेला काम देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांकडून भटके कुत्रे पकडून केंद्रावर नसबंदी झाल्यावर जिथून कुत्रे पकडून आणले तेथे पुन्हा सोडण्यात आले.

पालिकेच्या आरोग्य खात्याने पाळीव प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी नसबंदीचा कार्यक्रम २००६ पासून आखला आहे; परंतु या मोहिमेलाही प्राणीप्रेमींकडून नाहक विरोध आहे.

...

...

नागरिकांची मागणी

- केद्र आणि राज्य सरकारने महानगरपालिकेला अनुदान देऊन निर्बिजीकरण मोहिमेत वाढ करावी.

- भटके कुत्रे पकडण्याच्या पथकांमध्ये वाढ करावी.

राज्य शासनामार्फत दर पाच वर्षांने पशुगणना केली जाते.

...

संरक्षणासाठी जनजागृती नाही

कुत्रा चावण्यापासून आपले कसे संरक्षण करावे, यासाठी वृत्तपत्र तसेच विविध माध्यमांतून जनजागृती करतो, असे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. प्रत्यक्षात शहरात अशी जनजागृती कुठेच दिसत नाही.

...

कुत्र्यांचा हल्ला टाळण्यासाठी ‘हे’ करा

- झोपलेल्या, खात असलेल्या तसेच पिल्लासोबत असलेल्या कुत्र्यांना डिवचू नका

- कुत्र्याच्या पिल्लाजवळ जाणे टाळा, संरक्षणासाठी कुत्री हल्ला करू शकते.

- बांधलेल्या, भिंतीमागे असलेल्या, भुंकत असलेल्या कुत्र्याजवळ जाणे टाळा

- कुत्र्याच्या जवळून धावू नका, तो घाबरून चावू शकतो.

- कुत्र्याला सरळ नजरेने पाहू नका किंवा मागे बघून पळू नका.

- कुत्रा घाबरून तुमच्या दिशेने धावत आला तर एकाच ठिकाणी थांबा, त्याच्याकडे न पाहता जमिनीकडे पाहा आणि हळूहळू मागे सरका

...

कुत्र्यांच्या संख्या नियंत्रणासाठी

- महापालिकेने नसबंदीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावा

- कुत्रा पाळणाऱ्यांना तसेच विकणाऱ्यांना परवाना सक्तीचा करावा

- पाळीव कुत्र्यांचे लसीकरण

- रेबीजसंदर्भात जनजागृती करून दक्षतेचे आवाहन

...

Web Title: Law and dog lovers obstacles in eliminating the number of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.