ई-फायलिंग बंद करण्यासाठी वकिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 09:51 PM2023-04-05T21:51:07+5:302023-04-05T21:51:31+5:30
Nagpur News ई-फायलिंग बंद व्हावी, याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयातील काही वकिलांनी बुधवारी आंदोलन केले. ॲड. विलास राऊत व ॲड. नितीन रुडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
नागपूर : ई-फायलिंग बंद व्हावी, याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयातील काही वकिलांनी बुधवारी आंदोलन केले. ॲड. विलास राऊत व ॲड. नितीन रुडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
आंदोलनात जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे, माजी अध्यक्ष ॲड. कमल सतुजा, ॲड. वैभव जगताप, ॲड. तरुण परमार, ॲड. कैलाश वाघमारे, ॲड. रवींद्र बागडे, ॲड. मुन्ना उके, ॲड. योगिता रामटेके आदी वकील मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. याप्रसंगी ई-फायलिंग बंद करा, ई-फायलिंगचे सक्तीकरण म्हणजे वकिलांचे व्यवसाय हरण, ई-फायलिंगची मनमानी चालणार नाही अशा घोषणा देऊन ई-फायलिंगचा विरोध करण्यात आला.
ॲड. रोशन बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आवश्यक सुविधा व मनुष्यबळाशिवाय ई-फायलिंगची सक्ती केल्यास कनिष्ठ न्यायालयांमधील वकिलांना मनस्ताप होईल, असे मत व्यक्त केले. सध्या ई-फायलिंग पूर्णपणे अंमलात आणण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे फिजिकल फायलिंगचा पर्याय उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.