आघाडीचा पेच अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:05+5:302021-07-04T04:07:05+5:30

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी ...

The lead patch still remains | आघाडीचा पेच अजूनही कायम

आघाडीचा पेच अजूनही कायम

Next

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही, हा संभ्रम अजूनही कायम आहे. कारण आघाडीचा चेंडू प्रदेशाच्या फळीत आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ५ जागांचा पेच सुटल्याचा दावा करीत, रविवारी उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या बाबतीत बैठकी झाल्या आहेत. राष्ट्रवादीने दिलेल्या प्रस्तावावर स्थानिक काँग्रेसने प्रदेशाचे मार्गदर्शन मागविले आहे. तर महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखतीही आटोपल्या आहे. जिल्हाध्यक्ष मुळक यांनी शनिवारी आघाडीचा निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आघाडीच्या बाबतीत प्रदेशाकडे स्थानिक नेत्यांचे मत त्यांनी पाठविले होते. मुळकांनी रविवारी उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. परंतु आघाडीच्या बाबतीत प्रदेशाकडेच बोट दाखविले आहे. राष्ट्रवादी मात्र आघाडीच्या बाबतीत सकारात्मक आहे. राष्ट्रवादीने गुमथळा सर्कलचा आग्रही सोडला आहे.

- आमचे उमेदवार निश्चित झाले आहे. यादी आमच्या बड्या नेत्यांना दाखविण्यात येणार आहे. रविवारला यादी जाहीर करण्यात येईल.

अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजप

- काँग्रेस कोर कमिटीची बैठक झाली आहे. रविवारी आघाडीचा तिढा सुटेल व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.

राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

- गुमथळा सर्कलचा दावा आम्ही सोडला आहे. कुही तालुक्यातील राजोला सीटसाठी आम्ही आग्रही आहोत. याबाबत काँग्रेस सकारात्मक निर्णय घेऊन अपेक्षा आहे.

बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: The lead patch still remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.