मुंबई-पुण्याच्या रेल्वेगाड्या अजनीवरून सोडा

By admin | Published: January 8, 2015 01:21 AM2015-01-08T01:21:58+5:302015-01-08T01:21:58+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्याची मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता

Leave Mumbai-Pune train from Ajni | मुंबई-पुण्याच्या रेल्वेगाड्या अजनीवरून सोडा

मुंबई-पुण्याच्या रेल्वेगाड्या अजनीवरून सोडा

Next

सदस्यांची मागणी : विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्याची मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची १४५ वी बैठक ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले.
‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान विभागात केलेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली.
बैठकीत सतीश बंग, हर्षवर्धन सिंघवी, दिलीप ठकराल, क्रिष्णा कुमार पांडे, रोहित अग्रवाल, डॉ. अनिल लद्दड, प्रभाकर सुंचुवार, बृजभूषण शुक्ला, शिवचरण मिश्रा, जितेंद्र देसाई, विजय गुल्हाने यांनी विविध सूचना मांडल्या.
यात आमला बैतुल पॅसेंजरचा इटारसीपर्यंत विस्तार, बैतुल स्टेशनवर इंडिकेटर बोर्ड लावणे, नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्वेकडे आणि पश्चिमेकडील भागात अपंगांसाठी पार्किंगची व्यवस्था, प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर प्रसाधनगृहाची व्यवस्था, सेवाग्राम स्थानकावर रँपची व्यवस्था, बल्लारशा ते नागपूरदरम्यान शटल ट्रेन चालविणे, नागपूर ते पुणे दरम्यान दुरांतो एक्स्प्रेस चालविणे आदी मागण्या करण्यात आल्या.
बैठकीला वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, अप्पर मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आर. के. द्विवेदी, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक गौतम जैन, वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Leave Mumbai-Pune train from Ajni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.