अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:10 AM2018-10-20T01:10:21+5:302018-10-20T01:13:47+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा, जवळच्या व्यक्तींकडून होणारे व्यभिचार-बलात्कार, आत्महत्या तसेच जातीय संघर्ष व भेदभावाच्या घटना वेदनादायी व चिंताजनक आहेत. यावर नियंत्रणसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा, जवळच्या व्यक्तींकडून होणारे व्यभिचार-बलात्कार, आत्महत्या तसेच जातीय संघर्ष व भेदभावाच्या घटना वेदनादायी व चिंताजनक आहेत. यावर नियंत्रणसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेजारी देशांची शांतीपूर्वक संबंध बनविण्याचे प्रयत्न कायम ठेवण्यात आले. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात दृढतेने उभे राहून आपली भूमिका सेना, शासन व प्रशासनाने दाखवून दिली. सैन्य व सुरक्षादलांचे धैर्य वाढविणे, त्यांना संपन्न बनविणे, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे इत्यादी गोष्टींना प्रारंभ झाला व त्याचा वेग वाढतो आहे. सुरक्षादलांचे जवान व कुटुंबियांचे योगक्षेम कुशल रहावे यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. गृहमंत्रालय, सुरक्षा मंत्रालय, अर्थ मंत्रालय इत्यादी अनेक विभागांतून सुरक्षादलांशी संबंधित योजनांचा विचार व अंमलबजावणी होणे प्रशासकीय दृष्टीने आवश्यक आहे.अंदमान-निकोबार सह इतर बेटं संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्यांच्यावर नजर तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेथील व्यवस्थेला बळ दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूमी तसेच सागरी सीमाक्षेत्रांत राहणाऱ्या बांधवांपर्यंत रोजगार, शिक्षण, आरोग्य इत्यादींची व्यवस्था पोहोचत राहीली पाहिजे यासाठी शासन व समाज या दोघांनीही प्रयत्न वाढविले पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.
पोलीसांचा अवस्था सुधारावी
अंतर्गत सुरक्षेत पोलिसांची मौलिक भूमिका असते. त्यांच्या अवस्थेत सुधारणेची शिफारस पोलीस आयोगाने केली आहे. त्यावर विचार व सुधारणेच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गांसाठी बनलेल्या योजना योग्य पद्धतीने लागू व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाने अधिक तत्परता व पारर्शकता बाळगण्याची आवश्यकता आहे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.
सुरक्षा उत्पादनांसंदर्भात आत्मनिर्भरता यावी
‘राफेल’ कराराच्या वादावरुन राजकारण पेटले असताना सरसंघचालकांनी आत्मनिर्भरतेवर भर देण्याचा सल्ला दिला. सुरक्षा उत्पादनांबाबत संपूर्ण आत्मनिर्भरता साधल्याशिवाय देशाच्या सुरक्षेसंदर्भात आश्वस्त होऊ शकत नाही. या दिशेने देशाच्या प्रयत्नांचा वेग वाढवावा लागेल, असे ते म्हणाले.