विधानभवन विधिमंडळ सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:32 IST2019-12-07T21:30:32+5:302019-12-07T21:32:22+5:30
हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शनिवारी विधिमंडळाचे सुरक्षारक्षकही पोहोचले असून त्यांनी विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे.

विधानभवन विधिमंडळ सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शनिवारी विधिमंडळाचे सुरक्षारक्षकही पोहोचले असून त्यांनी विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे.
हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल. विधानसभा अध्यक्षांकडून हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून येथील स्थानीक प्रशासनाच्या कामालाही गती आली आहे. काम आता अंतिम टप्प्यात आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी तयारी व सुरक्षेचा आढावाही घेतला. सोमवारी ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोल हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेतील.
दरम्यान शनिवारी दुपारी विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी विधान भवनाचा सुरक्षेचा ताबा आपल्या आहात घेतल्याने सुरक्षा अधिक कडक झाली आहे. सोबत पोलीसांचीही सुरक्षा आहे. त्यामुळे आजपासून विधानभवनात संबंधित लोकांना आवश्यक कामासाठी जातांना सुद्धा ओळखपत्राशिवाय जाता येणार नाही. याचा प्रत्यय शनिवारपासूनच लोकांना आला.