‘लिओनार्दाे दा विंची’चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 16, 2016 03:12 AM2016-07-16T03:12:16+5:302016-07-16T03:12:16+5:30

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्दो दा विंची’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.

'Leonardo da Vinci' gives a spontaneous response to the film | ‘लिओनार्दाे दा विंची’चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लिओनार्दाे दा विंची’चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे आयोजन : छापखाना व कलाश्रय ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम
नागपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्दो दा विंची’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. छापखाना ग्रुप व कलाश्रय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषत: मोठ्या संख्येत चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत दाखविण्यात आलेल्या या चित्रपटातून ‘लिओनार्दो दा विंची’ यांची महान चित्रकारिता, मूर्तिकारिता, वास्तुशिल्पकारिता, संगीतकारिता, कुशल यांत्रिककारिता, अभियंता व वैज्ञानिकता यावर प्रकाश टाकण्यात आला. अष्टपैलूत्वाचे धनी असलेले लिओनार्दो दा विंची यांचा जन्म इटली येथे १४५२ मध्ये तर मृत्यू १५१९ साली झाला. ते लहानपणी डिस्लेक्सिया आजाराने पीडित होते. यामुळे अक्षरओळख करण्यात अडचण येत होती. त्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चित्र हे माध्यम बनविले. त्यांना जे काही समजत होते ते चित्रातून व्यक्त करीत होते. चित्रांशी मैत्री करीत पुढे ते एक महान चित्रकार झाले. लिओनार्दो दा विंची हे केवळ चित्रकारच नव्हते तर ते वैज्ञानिक, अभियंता, मूर्तिकार, संगीतकार, गणिततज्ज्ञ, खगोलजीवतज्ज्ञही होते. त्यांनी अनेक कलाकृतींसोबतच ‘मोनालिसा’ व ‘द लास्ट सपर’ या महान कलाकृती तयार केलेल्या आहेत.
या चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी माजी आमदार दीनानाथ पडोळे, वसंत चव्हाण, प्रसिद्ध चित्रकार रघु नेवरे, प्रा. सदानंद चौधरी, मिलिंद लिंबेकर, प्रकाश बेतावार, सुभाष तुलसीता यांच्यासह छापखाना ग्रुपचे कलावंत शेखर तांडेकर, मौक्तिक काटे, आनंद डबली, अभिषेक चौरसिया, महेश मानकर, शरद पवार चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी व कलाप्रेमी उपस्थित होते.
कलेला प्रोत्साहन देणाऱ्या यासारख्या उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Leonardo da Vinci' gives a spontaneous response to the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.