विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

By admin | Published: January 7, 2015 10:01 PM2015-01-07T22:01:49+5:302015-01-08T00:02:31+5:30

खेड तालुक्यातील घटना : वनविभागाच्या मदतीने काढले बाहेर

Leopard dead in the well | विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

Next

आवाशी (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील आवाशी येथे एका सार्वजनिक विहिरीत आज, बुधवारी दुपारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.येथील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी आवाशी ग्रामपंचायतीचे कर्मचारी राकेश हरिश्चंद्र आंब्रे हे सकाळी साडेदहा वाजता टीसीएल पावडर टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी आतमध्ये बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो हालचाल करीत नसल्याने मृत असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी सरपंच सुरेश राऊत यांना ही बाब तत्काळ कळविली. त्यांनी खेडचे वनपाल एस. जी. सुतार यांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. काडवलीचे वनरक्षक आर. डी. खोत, तळ्याचे यशवंत सावर्डेकर, खवटीचे म. को. जांभळे हेही घटनास्थळी दाखल झाले.
या सर्वांनी बिबट्याला चारही बाजूने दोरी बांधून बाहेर काढले. तत्पूर्वी लोटेचे पोलीस शरद मांडवकर हेही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा केला. बिबट्या मादी जातीचा असून, लांबी १५६ सें.मी. आहे. वय अंदाजे साडेतीन वर्षे असून, त्याचा काही दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Leopard dead in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.