अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार
By दयानंद पाईकराव | Updated: July 11, 2024 14:56 IST2024-07-11T14:56:01+5:302024-07-11T14:56:25+5:30
नागपूर-उमरेड महामार्गावर चक्रीघाट येथील घटना.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार
दयानंद पाईकराव : नागपूर
नागपूर : अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर उमरेड महामार्गावरील चक्रीघाट येथे रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर-उमरेड महामार्गावर चक्रीघाट येथे गुरुवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास एक बिबट रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात अज्ञात भरधाव वाहनाने या बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा केला. त्यानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत बिबट्याचे एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्वानुसार शवविच्छेदन करून वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमरेड येथे मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.