उमरेडलगतच्या शेतशिवारात बिबट्याचा अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:39+5:302021-09-04T04:12:39+5:30
उमरेड : मागील काही महिन्यापासून कोळसा खाण परिसरात बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले. त्यानंतर वनविभागाने सीसीटीव्ही आणि पिंजरा लावत बिबट्याला ...
उमरेड : मागील काही महिन्यापासून कोळसा खाण परिसरात बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले. त्यानंतर वनविभागाने सीसीटीव्ही आणि पिंजरा लावत बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेत वनविभागाला अपयश आले. आता उमरेड परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा अधिवास दिसून येत आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून, कोळसा खाण परिसरातील हाच तो बिबट की अन्य दुसरा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मौजा गांगापूर(वेकोलि आमनदी)नजीकच्या परिसरात असलेल्या विजय बुटोलिया, वैभव पुनवटकर, राजू बंड यांच्या शेतात बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे.
सध्या शेतशिवारात फवारणीसह अन्य कामे सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांनी याबाबत वनविभागाकडे सूचना दिली. फटाके लावा, असा सल्ला वनविभागाने दिला. मात्र या परिसरात तातडीने सीसीटीव्ही आणि पिंजरा लावण्याची मागणी अशोक डाखोरे, अरुण डाखोरे, नीलेश लाडेकर, मोहन चिटणीस, गंगाराम मोहिनकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो : उमरेडनजीक असलेल्या गांगापूर परिसरातील शेतशिवारात आढळून आलेले बिबट्याच्या पंजाचे ठसे. (०३ यूएमपीएच ०२)