ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:35+5:302021-07-16T04:07:35+5:30

नागपूर / हिंगणा : हिंगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात पुन्हा बिबट्या फिरायला लागला आहे. गेल्या आठवड्यात अंबाझरी क्षेत्रातील ...

Leopard sightings at Ordnance Factory premises | ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात बिबट्याचे दर्शन

ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात बिबट्याचे दर्शन

googlenewsNext

नागपूर / हिंगणा : हिंगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात पुन्हा बिबट्या फिरायला लागला आहे. गेल्या आठवड्यात अंबाझरी क्षेत्रातील नागलवाडी गावाजवळ दिसल्याच्या चर्चेनंतर गुरुवारी त्याचे पमगार्क आढळून आल्याने या परिसरातील वास्तव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या आठवड्यात त्याला नागलवाडी गावाजवळ पाहण्यात आले होते. ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीच्या सुरक्षा रक्षकांनी व अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला होता. दरम्यान पुन्हा १० नंबर चौकी ते ११ नंबर चौकी क्षेत्रात पहाटे १ वाजून ३० मिनिटाने डी. एस. सी. जवान भगतसिंग यांना बिबट दिसला. काही वेळाने २.३० वाजता पर्यवेक्षक पी. एल. पोटभरे यांनीही ९ नंबर चौकी पासून जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर त्याला पाहिले. वन विभागाला ही माहिती तातडीने कळविण्यात आली. हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व एसआरपीएफच्या जवानांनी दिवसभर या परिसरात बिबट्याचा शोध घेतला.

वन विभागाच्या पथकाने त्याचे पगमार्क घेतले असून पिंजरे लावून त्याला पकडता येईल, का, या दृष्टीनेही आढावा घेतला जात आहे.

...

नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. हा बिबट हा अंबाझरी परिसरातीलच असून अंबाझरी जैवविविधता उद्यानापेक्षा हे क्षेत्र चौपट मोठे आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रात्री एकटे फिरणे टाळावे, समूहान जावे, शेतात जाताना काठी सोबत ठेवावी. आढळल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्र. १९२६ वर तात्काळ सूचना द्यावी असे आवाहन उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा यांनी नागरिकांना केले आहे.

...

Web Title: Leopard sightings at Ordnance Factory premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.