१० हजार मुलांना फूटपाथवर अ, आ, ई चे धडे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:27+5:302021-09-22T04:09:27+5:30

निशांत वानखेडे नागपूर : ‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे ...

Lessons of A, B, E for 10,000 children on the sidewalk () | १० हजार मुलांना फूटपाथवर अ, आ, ई चे धडे ()

१० हजार मुलांना फूटपाथवर अ, आ, ई चे धडे ()

Next

निशांत वानखेडे

नागपूर : ‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे आहे. ‘उपाय’ संस्थेने नुकताच १२ वा स्थापना दिवस साजरा केला. फूटपाथवर वाढलेल्या, जगलेल्या, शाळेची इमारतही न पाहिलेल्या निरागस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडण्याचा ताे वर्धापन दिन हाेय. नागपूर जिल्ह्यातील माैद्यात सुरू झालेल्या फूटपाथ स्कूलचे राेपटे देशभरात रुजविण्याचा आणि ११००० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याचा हा प्रवास आहे. ताे जेवढा अतुलनीय तेवढाच मानवीयही आहे.

एनटीपीसी माैदा येथे सेवारत अभियंता वरुण श्रीवास्तव यांना शाळेत न जाता भटकणाऱ्या मुलांना पाहून काहीतरी करण्याची इच्छा झाली. काेण काय म्हणेल, असा मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविणे सुरू केले. त्यांचे अनुकरण करून काही संवेदनशील तरुण त्यांच्याशी जुळले आणि नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. महाविद्यालयीन, नाेकरीपेशा तरुण येथे सायंकाळी येऊ लागले आणि या मुलांसाेबत वेळ घालवून त्यांना अ, आ, ई चे धडे देऊ लागले. पाहता-पाहता तरुण जुळत गेले. मग माऊंट राेड, पागलखाना चाैक, सक्करदरा, वर्धमाननगर, लक्ष्मीनगर असे एक-एक करीत ११ फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. शिक्षण फूटपाथपर्यंत या मुलांना शाळांपर्यंत पाेहोचविण्याचे कामही या तरुणांनी केले. या काळात वरुण यांच्या शिकविण्याने १० वीपर्यंत गेलेल्या मुलांनी त्यांच्या गावी शाळा सुरू केल्या. असे ११ सेंटर माैद्याच्या आसपासच्या गावात आज सुरू आहेत.

ही शाळा नागपूरपुरती मर्यादित राहिली नाही. पुण्यातील तरुणांनी ‘उपाय’शी जुळून तेथे केंद्र सुरू केले. पुढे गुडगाव, बंगलोर, दिल्ली व आता मध्यप्रदेशच्या गादरबारा येथे फूटपाथ शाळा सुरू झाली. असे ४० केंद्र आज देशात कार्यरत असून २५० च्यावर स्वयंसेवक मुलांना शिकविण्याचे काम करतात. या फूटपाथ शाळांमधून १२ वर्षांत ११ हजार मुले शिकून निघून गेली. काही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

काेराेना काळातही सेवा

काेराेनाकाळात ‘उपाय’च्या कार्यकर्त्यांनी ३५ हजार लाेकांना अन्नधान्य पुरवठा केला. ६०० लाेकांचे लसीकरण केले. ७३० लाेकांना वैद्यकीय सुविधा पुरविली. १० ऑक्सिजन सहायता केंद्र चालविले

देशात आठ दशलक्ष मुले शाळेच्या बाहेर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. कुणीतरी जबाबदारी घेतली तर एक-एक मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकताे. ही मुले शाळेत जाऊ शकत नाही तर शाळा त्यांच्यापर्यंत पाेहोचविता येते. थाेडा विचार करून या निरागस मुलांसाठीही वेळ काढायला हवा.

- वरुण श्रीवास्तव, संस्थापक, ‘उपाय’

Web Title: Lessons of A, B, E for 10,000 children on the sidewalk ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.